अकोला : आज राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांचा वाढदिवस होता. अनेकांनी मिटकरी यांना वाढदिवसानिमित्त भेटून परस्पर शुभेच्छा आणि भेटवस्तू दिल्या. मात्र, यादरम्यान शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या काही युवकांनी अमोल मिटकरी यांना एक आगळी वेगळी भेटवस्तू भेट दिली. अन् दिलेल्या या भेटवस्तूवरून सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल अन् फटकेबाजी होत आहे. कारण, भेटवस्तू दिलेल्यामध्ये नाही कुठली वस्तू आहे, नाही कुठले फोटो आहे. या युवकांनी चक्क मिटकरींना वाढदिवसानिमित्त ‘टरबूज’ भेट दिलं आहे. अन् मिटकरींनी ते स्वीकारलंही.

दरम्यान, वाढदिवसाला कुठला केक न कापता हे ‘टरबूज’ कापण्यात यावं असा युवकांनी हट्ट धरला. परंतू, सद्यस्थितीत राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडी या ‘टरबूज’ मुळेच घडत आहेत, असा हसत हसत खोचक टोला त्यांनी यावेळी लगावला. त्यामुळेच आपण हे ‘टरबूज’ कापणार नाही. पण आपण आणलेल्या भेटवस्तूचा मान ठेवत हे ‘टरबूज’ स्वीकारतोय, असं म्हणत अमोल मिटकरी यांनी या युवकांकडून ‘टरबूज’ स्वीकारले. सध्या या संदर्भात सोशल मीडियावर चांगलचं ट्रोलींग आणि फटकेबांजी होतं आहे. दरम्यान, व्यासंगी आणि अभ्यासू प्रबोधनकार, शिवव्याख्याते अशी आमदार अमोल मिटकरी यांची ओळख आहे. ते नेहमीचं ट्रोल आणि त्यांचा व्याख्यानांमुळे चर्चेत असतात.

फ्लोअर टेस्टला आर्मी, पॅरा मिलिटरी लावतील पण केंद्राला जगाला उत्तर द्यावं लागेल : आदित्य ठाकरे
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरुद्ध पुकारलेल्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी या सगळ्यामागे भाजपचा हात असल्याचा आरोप केला आहे. अमोल मिटकरी म्हणाले, ‘शिंदे साहेब तुम्ही परत या, तुमच्यासारख्या नेत्याची या महाराष्ट्राला गरज आहे. तुम्ही भाजपसोबत जाऊन स्वत:चा सत्यानाश करुन घेणार आहात’, असंही यावेळी मिटकरी म्हणाले.

शिंदे रात्री गुवाहाटीहून निघाले, मध्यरात्री बडोद्यात फडणवीसांशी भेट, शाहांचीही उपस्थिती?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here