मुंबई : बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्याविरोधात गेल्या दोन २४ तासांत शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. एकनाथ शिंदे यांना दिलेली वेळ आता संपली आहे. त्यांच्यासाठी परतीचे दोर कापले आहेत, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज स्पष्ट केलं. त्यानंतर गुवाहाटीमधून एकनाथ शिंदे यांनी नवं ट्विट केलं आहे. महाविकास आघाडीच्या अजगराच्या विळख्यातून शिवसेना आणि शिवसैनिकांना सोडवण्यासाठीच मी लढतो आहे, असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.



बंडखोर शिंदे गटाच्या व्यूव्हरचनेला निष्पभ्र करण्यासाठी तसेच शिवसेनेची पडझड रोखण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि तमाम शिवसैनिक मैदानात उतरले आहेत. आज शिवसेना भवनात शिवसेना पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत बंडखोर शिंदे गटाविषयी आक्रमक भूमिका घेतली गेली. त्यानंतर आज आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेच दोन मेळावे झाले. ज्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ‘शिवसैनिकांनो, मी तुमच्यासाठी लढतोय’, अशा आशयाचं ट्विट केलं आहे.

एकनाथ शिंदे यांनी ट्विटमध्ये काय म्हटलंय?

“प्रिय शिवसैनिकांनो, नीट समजून घ्या, महाविकास आघाडीचा खेळ ओळखा..! महाविकास आघाडीच्या अजगराच्या विळख्यातून शिवसेना व शिवसैनिकांना सोडवण्यासाठीच मी लढत आहे. हा लढा तुम्हा शिवसैनिकांच्या हिता करीता समर्पित…. आपला एकनाथ संभाजी शिंदे”

आई-बाबा म्हणाले की वाईट एकाच गोष्टीचं वाटतं, आदित्य ठाकरेंकडून हळवी आठवण

ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांचं शक्तीप्रदर्शन

बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ ठाण्यात हजारो लोक जमले आहेत. ‘आम्ही भाई समर्थक’, असे पोस्टर्स कार्यकर्त्यांनी हातात घेतलेले आहेत. ‘नेता कैसा हो, एकनाथ शिंदे जैसा हो..’, ‘एकनाथ भाई तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हो’, अशा घोषणांनी ठाणे दुमदूमून गेलं होतं. एकनाथ शिंदे यांना समर्थन देण्यासाठी ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के, शिवसेनेचे अनेक नगरसेवक, सेना पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here