maharashtra political crisis: एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना अडचणीत आली आहे. आपल्यासोबत ४६ आमदार असल्याचा शिंदे यांचा दावा आहे. मात्र यातील काही आमदारांना माघारी परतायची इच्छा आहे. यातील एका आमदारानं सेनेचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरेंना फोन केला होता.

 

rebel shiv sena mla calls khaire
शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे

हायलाइट्स:

  • शिवसेनेचे बंडखोर आमदार बोरनारे यांचा खैरेंना फोन
  • खैरे साहेब, मध्यस्थी करा; बोरनारेंची मागणी
  • बंडखोर आमदारांना माघारी परतण्याची इच्छा
औरंगाबाद: शिवसेनेचे वरिष्ठ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेना आणि महाविकास आघाडीला अडचणीत आणलं आहे. गेल्या चार दिवसांपासून शिंदे आणि समर्थक आमदारांचा मुक्काम गुवाहाटीत आहे. शिवसेनेचे दोन आमदार मुंबईत परतले आहेत. तर २१ आमदार संपर्कात असल्याचा दावा सेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. काही आमदारांचा माघारी परतण्याचा विचार आहे.

शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे काल एबीपी माझा या वृत्तवाहिनाशी संवाद साधत होते. त्याचवेळी त्यांना सेनेचे वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांचा फोन आला. बोरनारे यांनी खैरे यांच्याकडे मध्यस्थीची विनंती केली. त्यावर तुम्ही परत कधी येणार? मी तुम्हाला उद्धव ठाकरेंकडे घेऊन जातो, असं खैरे बोरनारे यांनी म्हणाले.
शिवसेनेचं ठरलंय! उद्धव ठाकरेंचा इरादा पक्का; शिंदे गटाला तीन आघाड्यांवर दे धक्का?
बोरनारे यांनी खैरे यांच्याकडे मध्यस्थीची मागणी केली. तिकडे काय सुरू आहे, असा प्रश्न खैरे यांनी बोरनारे यांना विचारला. त्यावर चहा, नाश्ता, गप्पा सुरू असल्याचं उत्तर बोरनारे यांनी दिलं. मी मध्यस्थी करतो. तुम्हाला उद्धव ठाकरेंकडे नेतो. किती जण येणार ते सांगा, असा प्रश्न खैरेंनी विचारला. यावर सर्वांसाठी मध्यस्थी करा, असं बोरनारे म्हणाले. सर्वांसाठी नाही. आपल्या जिल्ह्यातले किती आमदार येणार ते सांगा. मी मध्यस्थी करतो, असं खैरै यांनी म्हटलं.
आता शिंदेंसमोर फक्त अन् फक्त एकच पर्याय शिल्लक; कायदेतज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं
संजय राऊत यांच्याशी मध्यस्थीसाठी संपर्क साधला. मात्र पुढे काही झालं नाही. बोलणी फिस्कटली, असं बोरनारे यांनी खैरेंना फोनवर सांगितलं. त्यावर तुम्ही कधी येणार ते सांगा. मी तुमच्यासाठी मध्यस्थी करतो, असं खैरे म्हणाले. तुम्हाला उद्धव ठाकरेंनी तिकीट दिलं. त्यांनी तुमच्यासाठी प्रचार केला. १ लाख लोकांनी तुम्हाला मतदान केलं. एकनाथ शिंदे साहेब तर नंतर आले ना? उद्धव ठाकरेंनी तिकिटच दिलं नसतं तर, असा प्रश्न खैरेंनी विचारला. शिवसेना सोडून गेलेल्यांना पुढे काय भविष्य असतं? याआधी बंडखोरी करणाऱ्यांचं पुढे काय झालं? याची कल्पना तुम्हाला आहेच. त्यामुळे लवकर माघारी या, असं आवाहन खैरेंनी केलं.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : maharashtra political crisis shiv sena rebel mla ramesh bornare calls chandrakant khaire
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here