मुंबई: बॉलिवूडमध्ये अशा काही जोड्या आहेत, ज्यांची ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेष आवडते. यातीलच रोमँटिक जोडी म्हणजे नीतू कपूर आणि ऋषी कपूर (Rishi Kapoor and Neetu Kapoor). या कपलने विविध चित्रपट एकत्र केले आहेत, त्यांनी २२ जानेवारी १९८० साली लग्न केलं. कपूर कुटुंबातील लग्न असल्याने मोठा सोहळा झाला. त्यांचे लग्न राज कपूर यांच्या चेंबुर स्थित आरके हाऊसमध्ये पार पडलं होतं. त्यावेळी साधारण ५००० लोक उपस्थित होते, अशी माहिती विविध मीडिया रिपोर्ट्समधून समोर आली आहे.

नीतू कपूर

यावेळी लग्नात उपस्थित लोकांना पाहून नीतू आणि ऋषी कपूर दोघेही घाबरले होते. नीतू यांनी असे म्हटले की, वरातीत घोडीवर बसण्याआधी ऋषी कपूर यांना चक्कर आली होती. अभिनेत्रीने एका चॅट शोमध्ये बोलताना याविषयी माहिती दिली होती.

हे वाचा-चाहतीनं केलं असं काही, बिग बी म्हणाले ‘एक जगह तो छोडी होती’

लग्नात पोहोचली होती विचित्र माणसं
नीतू यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या लग्नात पाकीटमार देखील पोहोचले होते. त्यांनी गिफ्ट म्हणून दगड आणि चपला दिल्या होत्या. चांगले कपडे घालून पोहोचल्यामुळे या लोकांनी चांगला पाहुणचारही करून घेतला.

नीतू कपूर

बॉलिवूडमधील मोठ्या घराण्यापैकी असणाऱ्या कपूर कुटुंबात हे लग्न होतं. त्यामुळे सिने कलाकारांव्यतिरिक्त याठिकाणी अनेक क्षेत्रातील लोकं पोहोचली होती. याचाच फायदा घेत हे पाकिटमार याठिकाणी आले होते. त्यांनी परिस्थितीचा फायदा घेत तिथे बनावट गिफ्ट देऊन पाहुणचार करून घेतला होता. याविषयी बोलताना नीतू कपूर म्हणाल्या की, एवढ्या लोकांना पाहून त्यांनी आणि ऋषी कपूर यांनी ब्रँडी प्यायली होती. दोघांनीही तसेच सात फेरे घेतले होते. वरातीच्या वेळी ऋषी कपूर यांना चक्कर आली होती.

हे वाचा-‘हा तर हिंदूंचा अपमान!’ होतेय शमशेराला बॉयकॉट करण्याची मागणी

नीतू कपूर यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर गेल्या शुक्रवारीच त्यांचा ‘जुग जुग जियो’ या सिनेमा प्रदर्शित झाला आहे. यामध्ये त्यांच्यासह अनिल कपूर, वरुण धवन, कियारा अडवाणी, मनिष पॉल, प्राजक्ता कोळी अशी तगडी स्टारकास्ट आहे. सोशल मीडियावरही या सिनेमातील गाण्यांची चर्चा आहे. याशिवाय नीतू कपूर ‘डान्स दीवाने ज्युनिअर’या शोमध्ये परिक्षकाच्या भूमिकेतही पाहायला मिळतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here