म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

तब्बल सतरा भाषेत साहित्याच्या रूपाने राजर्षी शाहू महाराजांचे सामाजिक कार्य जगाच्या पातळीवर पोहोचल्यानंतर आता सहा भाषेतील चित्रपटांच्या माध्यमातून त्यांचे विचार पाहोचविण्यात येणार आहेत. यासाठी ‘शाहू छत्रपती’ हा चित्रपट निर्माण करत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे या चित्रपटाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पर्दापण करत आहेत.

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे सामाजिक न्यायाचे काम दीपस्तंभासारखे आहे. केवळ अठ्ठावीस वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले. त्यामुळे दिनदलितांचे कैवारी, लोकराजा म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. या राजाने केलेले कार्य जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचावे म्हणून अनेक भाषेत त्यांचे चरित्र अनुवादित करण्यात आले. इंग्रजी, रशियन, जर्मनी याबरोबरच कन्नड, तेलगू, गुजराती अशा अनेक भाषेत त्यांचे चरित्र उपलब्ध आहे.

या पार्श्वभूमीवर त्यांचे विचार व कार्य चित्रपटाच्या माध्यमातून भावी पिढीपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. त्यासाठी सहा भाषेत त्यांच्यावर चित्रपट काढण्यात येणार आहे. त्यामध्ये मराठी, कन्नड, हिंदी, इंग्रजी, तामिळ व तेलगू या भाषांचा समावेश आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री आव्हाड हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणास प्रारंभ होणार आहे. शाहू महाराजांची भूमिका कोण करणार हे अजूनही गुलदस्त्यात आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन वरूण सुखराज हे दिग्दर्शन करणार असून कथा ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांची आहे.
चौधरींच्या कंपनीसाठी नेहाने मिळवलं १०० कोटींचं डील, यामुळे होणार पहिल्या नवऱ्याची भेटकोल्हापुरातील न्यू पॅलेस येथे ‘शाहू छत्रपती’ या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते करण्यात आले आहे. या कार्यक्रमास ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
श्री. आव्हाड म्हणाले, थोर महापुरुषांच्या जीवनातील प्रत्येक प्रसंगातून अनमोल विचार समाजाला मिळतात. महापुरुषांचे आचार आणि विचार भावी पिढीसाठी मार्गदर्शक असल्याने या विचारांचा प्रचार आणि प्रसार होणे तितकेच महत्वाचे आहे. शाहू महाराजांचे विचार अनेक इतिहास संशोधकांनी त्यांच्या ग्रंथातून मांडले आहेत. आता हे विचार ‘शाहू छत्रपती’ या चित्रटपटाच्या माध्यमातून जगभर पोहचतील. यावेळी डॉ. विनय काटे व वरुण सुखराज यांनीही मनोगत व्यक्त केले.

Video : हातात मशाली, चेहऱ्यावर निर्धार; मुक्ता बर्वेला तरुणींची साथ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here