परभणी : पूर्णा तालुक्यातील धनगर टाकळी येथील विवाहितेच्या आत्महत्येनंतर माहेरच्या मंडळींनी संशय व्यक्त केल्यामुळे पोलिसांनी शवविच्छेदनाचा अहवाल तपासला असता विवाहितेने आत्महत्या केली नसून तिचा गळा आवळून खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी पतीचा जबाब नोंदवून असतात याची कबुली दिली आहे. याप्रकरणी चुडावा पोलीस ठाण्यामध्ये पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.

परभणीच्या पूर्णा तालुक्यातील चुडावा पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील धनगर टाकळी गावामध्ये रुक्‍मीनबाई गोपाळ आढाव या विवाहितेचा मृतदेह घरामध्ये गळफास घेतलेल्या स्थितीमध्ये २२ जून रोजी आढळून आला होता. या प्रकरणी सुरुवातीला चुडावा पोलीस ठाण्यांमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

Weather Today : राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ जिल्ह्यांना येलो आणि ऑरेंज अलर्ट
तपासादरम्यान माहेरच्या मंडळींनी घातपात असल्याचा संशय पोलिसांकडे व्यक्त केला होता. त्यामुळे पोलिसांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून विवाहितेच्या शवविच्छेदनाचा अहवाल मागवला आणि महिलेचे पती गोपाळ आढाव याला विश्वासात घेऊन चौकशी केली असता घरगुती कारणावरून पत्नी रुक्मिणी हिचा दोरीच्या साह्याने गळा आवळून खून केला. त्यानंतर घराच्या पत्रा खाली असलेल्या अडूला दोरी बांधून रुक्‍मीनबाई यांनी आत्महत्या केल्याचा बनाव केला असे पोलिसांना सांगितले.

यावरून पोलिसांनी गोपाळ आढाव, नामदेव आढाव, वर्षा आढाव, आशाबाई आढाव, गणेश आढाव यांच्या विरोधात चुडावा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गुलाब बाचेवड करत आहेत.

एकनाथ शिंदेंचा ‘भावी उपमुख्यमंत्री’ म्हणून उल्लेख; बीडच्या बॅनरची महाराष्ट्रभर चर्चा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here