maharashtra political crisis: एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना अडचणीत आली आहे. आपल्यासोबत ४६ आमदार असल्याचा शिंदे यांचा दावा आहे. शिंदेंच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे बॅकफूटवर गेले होते. मात्र पवारांच्यासोबतच्या तिसऱ्या बैठकीनंतर ठाकरेंनी रणनीती बदलली.

हायलाइट्स:
- शिंदेंच्या बंडानंतर सुरुवातीला ठाकरे बॅकफूटवर
- पवारांसोबतच्या बैठकीनंतर ठाकरेंनी रणनीती बदलली
- पवारांसोबतच्या बैठकीनंतर ठाकरेंचा आक्रमक पवित्रा
महाविकास आघाडी सरकार आणि पक्ष वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी वेगवान हालचाली सुरू केल्या आहेत. शिंदे यांच्या बंडानंतर शुक्रवारी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरेंची बैठक पार पडली. या बैठकीनंतर उद्धव ठाकरेंनी आक्रमक पवित्रा घेतला. या बैठकीला राष्ट्रवादीकडून शरद पवारांसोबत अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि जयंत पाटीलदेखील उपस्थित होते. या बैठकीत सध्याच्या राजकीय स्थितीवर चर्चा झाली. महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नसल्याचं बैठकीनंतर पटेल यांनी सांगितलं. थोरात यांनादेखील सरकार स्थिर असल्याचं म्हटलं.
बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी पावलं उचलावीत यासाठीचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. यानंतर १६ आमदारांना नोटिस बजावण्यात आली. बंडखोर आमदारांच्या मतदारसंघांमधील शिवसैनिक आक्रमक होतील आणि गुवाहाटीत असलेल्या आमदांराना माघारी परतावं यासाठी दबाव आणतील, अशी रणनीती बैठकीत ठरली. शिंदेंच्या बंडानंतरची पवार आणि ठाकरे यांच्यातील ही तिसरी बैठक होती.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : maharashtra political crisis cm uddhav thackeray ramps up battle against rebels after 3rd sharad pawar meeting
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network