मुंबई: अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने काही वर्षांपूर्वी ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेत ‘जान्हवी’ ही भूमिका साकारली होती. या मालिकेचं कथानक आणि त्यातील कलाकार प्रेक्षकांमध्ये विशेष लोकप्रिय ठरले होते. या मालिकेतील आणखी एक लोकप्रिय झालेली गोष्ट म्हणजे जान्हवी अर्थात तेजश्री प्रधान हिने या मालिकेत परिधान केलेले मंगळसूत्र. त्या तीन पदरी मंगळसूत्राची विशेष चर्चा झाली होती. दरम्यान आता आणखी एका अभिनेत्रीचं मंगळसूत्र चाहत्यांमध्ये लोकप्रिय होत आहे. अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिने ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत’नेहा चौधरी’ या भूमिकेसाठी परिधान केलेल्या मंगळसूत्राची सध्या सोशल मीडियावर विशेष चर्चा होत आहे.

हे वाचा-‘तारक मेहता..’ फेम अभिनेत्रीमध्ये झाला खूप बदल, साध्याभोळ्या सोनूचा बिकिनी लूक

नेहा आणि यशवर्धन यांचा अलीकडेच लग्नसोहळा उरकला. या शाही सोहळ्यात नेहाचा नऊवारी साडीतील लूक पाहायला मिळाली. अभिनेत्री प्रार्थना बेहेरे या मालिकेत नेहाच्या भूमिकेसाठी छोटं आणि मोठं मंगळसूत्र वापरताना दिसतेय. या दोन्ही मंगळसूत्राचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तुम्ही हे डिझाइन पाहिलं का?

नेहा कामत मंगळसूत्र

फोटो सौजन्य- धनश्री आर्ट ज्वेलर्स

प्रार्थना हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये सुंदर ज्वेलरी परिधान केली आहे. तिचे हे मंगळसूत्र देखील त्याच ज्वेलरी डिझायनरने डिझाइन केलं आहे. सोशल मीडियावर प्रार्थनाने तिच्या या ज्वेलरी डिझायनरला विविध फोटोंमध्ये टॅग देखील केलंय.

हे वाचा-नेहाने मिळवलं १०० कोटींचं डील, यामुळे अखेर होणार पहिल्या नवऱ्याची भेट

दरम्यान सध्या ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत नेहा आणि यश यांच्या लग्नाचा ट्रॅक सुरू आहे. यामध्ये नेहा कामत अर्थात लग्नानंतरची नेहा चौधरी घरासह ऑफिसमधली जबाबदारी देखील व्यवस्थित हाताळताना दिसतेय. अलीकडेच या मालिकेतील नेहाच्या पात्राने चौधरींच्या कंपनीत १०० कोटींचं डील मिळवलं. पण यामुळे तिची भेट तिचा पहिला नवरा अर्थात अविनाशशी होऊ शकते. कारण नेहाने डील क्रॅक केल्यानंतर यश सर्व कर्मचाऱ्यांना नेहाच्या हस्ते मिठाई देण्यास सांगतो. त्यामुळे येणाऱ्या एपिसोड्समध्ये नेहा आणि अविनाश समोरासमोर येऊ शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here