मुंबई : शिवसेना नेतृत्वाविरोधात बंड केलेल्या आमदारांविरोधात आता पक्षाने चांगलीच आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत मुंबईतील दहिसर येथे शिवसेनेच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात बोलताना संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली आहे. तसंच भाजपवरही निशाणा साधला आहे.

‘आपण जे कोणी आहोत ते शिवसेनेमुळे आहोत. आम्ही खासदार झालो, राष्ट्रीय नेते झालो, आज मोदी आणि शहा हेदेखील आम्हाला बघून रस्ता बदलतात, कारण त्यांना माहीत आहे हे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत, यांच्या नादी कोणी लागत नाही,’ असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

‘बंडखोरांनी मुंबईत येऊन दाखवावं’

‘गुवाहाटीतील रेडिसन ब्ल्यू हॉटेल हे बिग बॉसचं घर वाटत आहे. बंडखोरी केलेले निम्मे आमदार अपात्र ठरणार आहेत. या आमदारांना आज ना उद्या मुंबईत यावंच लागणार आहे. जे ४० जण तिथे आहेत ते प्रेतं आहेत. जेव्हा ते इथे परत येतील तेव्हा फक्त त्यांचं शरीर येईल त्यांचा आत्मा मेलेला असेल. त्यांना माहिती आहे की जेव्हा ते इथे येतील तेव्हा इथे जी आग लागली आहे त्यात काय होईल. बंडखोरांनी मुंबईत येऊन दाखवावं आणि प्रकाश सुर्वेने तर येऊनच दाखवावं, हे माझं आव्हान आहे,’ असा आक्रमक इशार संजय राऊत यांनी दिला आहे.

ठाकरे वि. शिंदे संघर्षात केंद्राची एंट्री; अमित शाहांकडून महत्त्वाचे आदेश जारी

‘हे बाहेरुन येतात आणि आम्हाला शिवसेना काय आहे ते शिकवतात. अब्दुल सत्तार आणि हिंदुत्वाचा काय संबंध? महाराष्ट्र आणि ठाकरे कुटुंबाविरोधात मोठं कारस्थान सुरू आहे. महाराष्ट्र त्यांना तीन भागात तोडायचा आहे. याला शिवसेना विरोध करेल, म्हणून शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे,’ असा गंभीर आरोपही राऊत यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here