maharashtra weather today: Weather Alert : पुढच्या ३-४ तासांत राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, ठाण्यासह ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट – weather alert heavy rain at isolated places in the districts of sindhudurg thane ghat areas of kolhapur and satara during next 3 4 hours
मुंबई : राज्यात मुंबई, ठाणे, नवी मुंबई या परिसरांत पावसाने दडी मारली आहे. पण राज्यातल्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. अशात हवामान खात्याकडून राज्यासाठी पुढचे ५ दिवस जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यानुसार, पुढील ३-४ तासात रत्नागिरी जिल्ह्यांतील काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील ३ ते ४ तासांत सिंधुदुर्ग, ठाणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील काही ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाची शक्यता आहे. यामुळे या जिल्ह्यांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात याला असून नागरिकांनी हवामानाचा अंदाज घेत घराबाहेर पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सत्तासंघर्षात राजकारणी व्यस्त; तर पावसाच्या ओढीनं शेतकरी त्रस्त दरम्यान, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, विदर्भामध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे तर मध्य महाराष्ट्रातही विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला. हवामान खात्याकडून पुढचे पाच दिवस पाऊस राहील अशी माहिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी पावसाचा अंदाज घेत घराबाहेर पडण्याच्या सूचना आहेत.
ठाणे, पालघर, मुंबई, रायगड, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली इथे सध्या जोरदार पाऊस सुरू आहे, अशात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.