मुंबई: गेल्या काही वर्षांत बॉलिवूडची एक वेगळीच बाजू जगासमोर आली आहे. झगमगाटच्या पलिकडचं एक वेगळं जग आता समोर येऊ लागलं आहे. ज्यांनी बॉलिवूडमध्ये काही काळ गाजवला आहे असे सेलिब्रिटी देखील आता पुढं येऊन याबद्दल सांगताना, अनेक खुलासे करताना दिसून येत आहेत. बॉलिवूडमध्ये चित्रपट मिळवण्यासाठी ते तो बॉक्स ऑफिसवर चालावा, यासाठी काय काय केलं जातं, कोणती पातळी गाठली जाते, हे अनेकदा पाहायला मिळालंय. याच बद्दलचा आणखी एक खुलासा अभिनेता अभय देओल यानं केला आहे.
Neha Kamat Mangalsutra: ‘जान्हवी’नंतर आता लोकप्रिय होतंय नेहाचं मंगळसूत्र, तुम्ही पाहिलं का डिझाइन?
एखादा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी जो वाद निर्माण केला जातो, त्यावर अभयनं भाष्य केलं आहे. हे खरं आहे की, चित्रपट चर्चेत यावा म्हणून, त्या संदर्भात वाद निर्माण केले जातात, अस तो म्हणतोय. लोकांना आकर्षित करण्यासाठी , त्यांचं लक्ष वेधण्यासाठी सेटवर कलाकारांच्या नात्याबद्दल सुरू असलेल्या अनेक खोट्या चर्चांना खत-पाणी घातलं जातं. इतकंच नाही तर चित्रपटांच्या प्रमोशन दरम्यान आम्ही ज्या मुलाखती देतो, त्यातील अनेक गोष्टीही त्यात आम्हाला काय बोलायचं, काय सांगायचं , हे सर्व आम्हाला टीमकडून सांगितलं जातं. चर्चेत राहण्यासाठी प्रसिद्ध चेहऱ्यांचा वापर केला जातो, असा खुलासा अभयनं केला आहे.


अंडरवर्ल्ड आणि बॉलिवूड कनेक्शनवर सोनाली बेंद्रेचा मोठा खुलासा, म्हणाली…
चाहत्यांना दिला खास सल्ला
अभयनं त्याच्या एका मुलाखतीत अफवांवर विश्वास न ठेवण्याचा सल्ला दिला. चाहत्यांनी सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांपेक्षा
स्वत: थोडा विचार करून वागलं पाहिजे, असं तो अभय म्हणतो.

अभयच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर , तो २००५मध्ये सोचा न था या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आला होता. त्यानंतर देव डी, जिंदगी ना मिलेगी दोबारा सारख्या चित्रपटांमधून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्याच्या इतर चित्रपटांमधील भूमिकांचंही प्रचडं कौतुक झालं. पण तो निवडक भूमिका करण्याला प्राधान्य देत असल्यानं सध्या तो मोठ्या पडद्याापासून लांब आहे. तो आता ओटीटीवर जास्त दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here