सातारा : एकनाथ शिंदे यांनी सरकार विरोधी बंड पुकारल्यानंतर त्यांच्या राजकीय, सामाजिक कामांचे व्हिडिओ व्हायरल होत असल्याचं पहायला मिळत आहे. त्याच पद्धतीने सध्या सोशल मीडिया आणि माध्यमांमध्ये त्यांच्या गावाची चर्चा होऊ लागली आहे. एकनाथ शिंदे यांचं गाव सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात वासलेलं गाव आहे.

कोयना जलाशयाच्या शेजारी निसर्गाचं वरदान लाभलेल त्यांचं दरे हे गाव सध्या चर्चेत आहे. या गावात रस्ते आणि पाण्याची सोय सध्या मुबलक आहे. शाळा ५ वी पर्यंत असून गावाला प्राथमिक आरोग्य केंद्र नाही आहे. आरोग्याच्या समस्येसाठी ग्रामस्थांना तापोळ्याच्या आरोग्य केद्रात जाव लागतं.

Weather Alert : पुढच्या ३-४ तासांत राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, ठाण्यासह ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट
कोयना जलाशयाच्या लगत कांदाटी खो-याच्या जवळ वसलेल्या या गावाला पुर्वी रस्ते आणि पाण्याची मोठी गैरसोय होती. मात्र, एकनाथ शिंदे यांनी काही वर्षांपासून गावाकडे लक्ष देत काही सुधारणा केल्या आहेत. गाडीने गावाला जायचं असेल तर महाबळेश्वरच्या बाजूने रस्ता आहे. मात्र, हा प्रवास ३ तासांचा आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांनी तापोळ्यावरून पुल बांधून नवीन रस्ता काढण्यासाठी जास्तीचा निधी मिळवत दरे भागातील गावांची दळनवळनाची सोय मिटवण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

यामुळे एकनाथ शिंदे बांधत असलेल्या हॅलिपॅडची चर्चा सध्या जिल्ह्यात सुरू आहे. एकनाथ शिंदे यांचं दरे गावात एक मोठं फार्महाऊस असून या ठिकाणी हॅलिपॅड सुद्धा बांधण्याचं काम सुरू आहे. मात्र, एवढ्या दुर्गम भागात असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या हॅलिपॅडची जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात चांगली चर्चा रंगली आहे.

सोन्याच्या मोहरा आणि विटा; IAS संजय पोपलींच्या घरातून मोठं घबाड हाती, PHOTO पाहून थक्क व्हाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here