ठाणे : ‘सध्या राज्यात जे राजकारण चाललं आहे हे शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न असल्याचं दिसत असले तरी यामागे कोणती तरी मोठी शक्ती आहे. त्यामुळे हे सगळं घडतंय असं म्हणायला वाव आहे. कुणी तरी ताकद देत असल्याशिवाय एकनाथ शिंदे इतकं धाडस करणार नाही भविष्यात कोण त्यांच्या पाठीमागे आहे हे समोर येईल’, असं सूचक विधान राष्ट्रवादीचे नेते व आमदार एकनाथ खडसे यांनी कल्याणमध्ये झालेल्या सत्कारसमारंभात केलं आहे. कल्याण-डोंबिवली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस व खान्देश संघटनांतर्फे एकनाथ खडसे यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता या सत्काराला खडसे आले होते.

माझ्या मागे जी शक्ती आहे, जी ताकद आहे ती तुमची आहे. मला सर्वोच्च स्थानापर्यंत पोहचविण्याचे काम तुम्ही केलं आहे. मी राज्याचा आमदार आहे कधी ही मला बोलवा मी येईल येत्या काही महिन्यात महिन्यातून एक दिवस कल्याणमध्ये तुमच्या समस्या जाणून घेण्यासाठी असेल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. यावेळी बोलताना त्यांनी प्रामाणिकपणे काम करून माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. जमिनीचे आरोप झाले, इतकं छळलय हे सांगण्यासाठी मी इथे उभा नाही. मात्र, राजकारण इतक्या खालच्या स्तराला जातं हे आयुष्यात पहिल्यांदा अनुभवलं आहे. चौकशा झाल्या इथपर्यंत ठीक होत ,नंतरच्या कालखंडात माझ्या कुटुंबाला त्रास दिला, माझा जावयी, माझ्या दोन्ही मुली, माझी पत्नी, यांच्यामागे चौकशी लावली, सगळं कुटूंब आठवड्याला इडी कार्यालयात असायचं, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

चोपड्याच्या आमदार लताबाई सोनवणेंना अपात्रतेसंदर्भात नोटीस; गेटवर लटकावली नोटीस
मी काय गुन्हा केला आहे, कुठे पैसे खाल्ले, काय घेतलं तुम्ही दाखवा ना? असा भावनिक सवालही खडसे यांनी यावेळी केला. मागच्या आठवड्यात माझ्या खात्यातले पैसे काढून टाकले एक रुपया ठेवला नाही ,पहिले खाते सिज केलं आता पैसे काढून टाकले, त्यानंतर राहते घर १० दिवसात खाली करण्याची नोटीस आली, असा नाथा भाऊने काय गुन्हा केला? असा प्रश्न त्यांनी यावेळी केला. असं करायचं असतं तर अनेकांना मला छळता आलं असतं, माझ्या हातात इतकी ताकद आणि शक्ती आहे की अनेकांना देशोधडीला लावू शकतो. दुर्दैवाने असा विचार मी करत नाही दुसऱ्यांना सहकार्याची भूमिका असते. न्यायालयाने संरक्षण दिलं म्हणून आम्ही संपूर्ण कुटुंब जामिनावर बाहेर आहोत. नाही तर संपूर्ण कुटुंब तुरुंगात असतं, या सगळ्या अडचणीत शरद पवार यांनी साथ दिली, मदत केली नाही तर नाथाभाऊ होत्याचा नव्हता झाला असता असंही खडसेंनी यावेळी स्पष्ट केलं.

सद्या जे राजकारणाबद्दल बोलताना हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे अस वरवर वाटत असलं तरी, या मागे कोणती तरी मोठी शक्ती आहे त्यामुळे हे सगळ घडत आहे. कुणी तरी ताकद देत असल्याशिवाय एकनाथ शिंदे इतकं धाडस करणार नाहीत. भविष्यात कोण त्यांच्या पाठीमागे आहे हे समोर येईलचं. गेल्या ४० वर्षात असं राजकारण मी अनुभवलं नव्हतं. राज्यात अस्थिरतेचे वातावरण आहे कोणासोबत आहे यावर आता विश्वास ठेवता येणार नाही. महाराष्ट्राच्या मंत्रिमडळातील बहुसंख्य मंत्र्यांनी बंड केलं आहे. शिवसेनेतून अनेक जण बाहेर पडत आहे. अनेक तांत्रिक प्रश्न निर्माण झाले आहेत. तांत्रिक प्रश्नांची सोडवणूक न्यायालय करू शकेल अशी स्थिती आहे, असंही एकनाथ खडसे यावेळी म्हणाले.

मंत्री गडाखांनाही फोन आले, पण बधले नाहीत; सहयोगींमधील शिवसेनेसोबत उरले एकटेच

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here