रत्नागिरी: संगमेश्वरला आज दुपारनंतर मुसळधार पावसानं झोडपून काढलं. माखजन, बुरंबाड, गोळवली, धामणी, साखरपा परिसरात गारपीट झाली. वादळी वाऱ्यामुळं साखरपा परिसरात दोन ठिकाणी झाडे कोसळली. तर काही वेळ वीज पुरवठा खंडित झाला होता. तसंच घरांचे मोठे नुकसान झाले.

कोल्हापुरात अवकाळी पाऊस

जिल्ह्यात शनिवारी कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे ग्रामीण भागातील अनेक घरांचे नुकसान झाले. कसबा, बावडा आणि आरे येथील आठ ते दहा घरांची पडझड झाली. इचलकरंजी नजीकच्या शहापूर येथे नारळाच्या झाडावर वीज कोसळली. आसपासच्या सात घरातील टीव्ही संच जळाले. जिल्ह्यातील विविध भागातील नुकसानीचा आकडा एक कोटी ५० लाखांहून अधिक आहे. कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम कारखान्याचे एक धुराडे कोसळल्यामुळे तब्बल एक कोटी रुपयांचा फटका बसला आहे. तर करवीर आणि हातकणंगले तालुक्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आकडा अधिक आहे, असं सांगितलं जात आहे.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here