मुंबई: होम मिनिस्टर कार्यक्रमामुळे आदेश बांदेकर हे घराघरात लोकप्रिय झाले आहेत. महाराष्ट्रातील तमाम वहिनींचे लाडके भावोजी झाले आहेत. गेल्या १८ वर्षांपासून हा कार्यक्रम महाराष्ट्रातील तमाम वहिनींमध्ये लोकप्रिय झाला आहे. यंदा हा कार्यक्रम ‘महा मिनिस्टर’ या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
या पर्वाच्या विजेत्या रत्नागिरीच्या लक्ष्मी ढेकणे या बनल्या आहेत.
का खास आहे ही ११ लाखांच्या पैठणी?
ही ११ लाखांची पैठणी तिच्यी किंमतीमुळं नव्हे तर आणखी एका गोष्टीमुळं खास आहे. ही पैठणी दिव्यांग कलाकारांनी तयार केली आहे. येवल्यातच ही पैठणी तयार झाली आहे. या पैठणीला अस्सल सोन्याची जर आहे . खऱ्या हिऱ्यांनी ही पैठणी सजली आहे.