Maharashtra political crisis | शिवसेना आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांच्या बाजूनेही तगड्या वकिलांची फौज मैदानात उतरणार आहे. शिवसेनेकडून कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी हे कायदेशीर बाजू मांडतील. तर रवीशंकर जंध्याल हे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांची बाजू मांडतील. त्यामुळे आज सर्वोच्च न्यायालयात कायदेशील मुद्द्यांचा कीस पडणार, यामध्ये शंकाच नाही.

हायलाइट्स:
- एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांना नोटीस
- अपात्रतेच्या कारवाईची टांगती तलवार
- शिवसेनेकडून कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी हे कायदेशीर बाजू मांडणार
एकनाथ शिंदे गटाला बजावण्यात आलेल्या अपात्रतेच्या नोटिसांना शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या दोन याचिकांवर न्या. सूर्यकांत व न्या. जे. बी. पारदीवाला यांच्या खंडपीठासमोर सोमवारी सकाळी साडेदहा वाजता सुनावणी होणार आहे.शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला अनुपस्थित राहिल्याबद्दल एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांना नोटीस बजाविण्यात आली होती. या नोटीसवर सोमवारी सायंकाळपर्यंत त्याला उत्तर द्यायचे आहे.
शिवसेनेत उरले फक्त ९ मंत्री
उदय सामंत हे रविवारी गुवाहाटीत जाऊन एकनाथ शिंदे गटाला मिळाल्यामुळे शिवसेनेच्या गोटातील मंत्र्यांची संख्या आणखी कमी झाली आहे.शिवसेनेच्या मंत्र्यांपैकी आदित्य ठाकरे हे एकमेव मंत्री शिल्लक आहेत. उदय सामंत हे आदित्य ठाकरेंच्या जवळचे मानले जातात. बंडखोर नेते एकनाथ शिंदेंसोबत गुवाहाटीत सध्या ९ मंत्री आहेत. तर आदित्य ठाकरे हे शिवसेनेचे एकमेव विधानसभेत निवडून आलेले मंत्री उरले आहेत.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : eknath shinde battle against shiv sena in supreme court harish salve will lead battle kapil sibal abhishek manu singhvi will present maha vikas aghadi government
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network