हे वाचा-लेकाने कोट्यवधी कमावूनही शेतात राबतोय हाडाचा शेतकरी! तरडेंची वडिलांसाठी खास पोस्ट
काय म्हणाले किरण माने?
किरण यांनी फेसबुकवर अशी पोस्ट केली आहे की, ‘काय स्पीड हाय राव! आपण उगीच कोर्टाच्या वेळखाऊ कामकाजाला शिव्या देतो. आपल्या देशातल्या न्यायव्यवस्थेचा चमत्कार बघा. आज संध्याकाळी ६.३० ला एकनाथ शिंदेंची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाली. रविवार असून, संध्याकाळी ७.३० वाजता रजिस्ट्रीनं याचिका स्विकारली आणि उद्या २७ ला सुनावणी ठरवली सुद्धा! निकालच लावून टाकायचा ना थेट.. जय सुप्रीम कोर्ट’.

राज्यातील राजकीय नाट्य सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचले आहे. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्या बंडखोर गटाने न्यायालयात धाव घेतली असून याचिकेवर २७ जून रोजी सुनावणी होणार आहे. शिवसेनेच्या मागणीनुसार १६ आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी विधानसभा उपाध्यक्षांनी नोटीस धाडली होती, त्या विरोधात बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी न्यायालयात दाद मागितली आहे. याविषयावर भाष्य करताना किरण माने यांनी न्याय व्यवस्थेच्या कारभारावर टिप्पणी केलीये.
हे वाचा-अमोल कोल्हेंच्या ‘शिवप्रताप गरूड झेप’च्या टीझरनं वाढवली प्रेक्षकांचा उत्कंठा
किरण यांच्या या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी त्यांच्या या पोस्टमधील उपहासाशी सहमती देखील दर्शवणाऱ्या कमेंट्स केल्यात. किरण यांच्या इतर पोस्टप्रमाणेच ही पोस्ट देखील व्हायरल होतेय.