Maharashtra political crisis | शिवसेनेचे जितके आमदार वाचतील त्यांना घेऊन आम्ही महाराष्ट्रात पक्ष वाढवू. नारायण राणे (Narayan Rane), छगन भुजबळ आणि राज ठाकरे (Raj Thackeray) हे पक्ष सोडून गेल्यानंतरही शिवसेना वाढली. शिवसेनेचे ५६ आमदार आहेत, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली ते आगामी काळात १०० च्या वर जातील, असा दावाही सुनील राऊत यांनी केला.

 

Sunil Raut Sanjay Raut
सुनील राऊत आणि संजय राऊत

हायलाइट्स:

  • शिवसेनेच्या गोटातील चिंता वाढली
  • तुम्ही सुनील राऊत यांना एकनाथ शिंदे यांच्या गोटात फोडाफोडी करण्यासाठी पाठवणार होतात का?
  • दुसऱ्याच क्षणाला राऊतांनी सूचक वक्तव्य करून याबाबतची उत्कंठा आणखी वाढवली
मुंबई: एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे संकटात सापडलेल्या शिवसेनेकडून जाणुनबुजून आपले आमदार शिंदे यांच्या गोटात पाठवले जात असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे. अशातच रविवारी सकाळपासून शिवसेनेचे नेते संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत (Sunil Raut) हेदेखील एकनाथ शिंदे यांना सामील होणार असल्याच्या चर्चेने जोर धरला होता. सुनील राऊत लवकरच गुवाहाटीत जातील, असे सांगितले जात होते. त्यामुळे शिवसेनेच्या गोटातील चिंता वाढली होती. मात्र, काही तासांनंतर ही केवळ अफवा असल्याचे सिद्ध झाले. या सगळ्यावर संजय राऊत यांनी सोमवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत भाष्य केले.

तुम्ही सुनील राऊत यांना एकनाथ शिंदे यांच्या गोटात फोडाफोडी करण्यासाठी पाठवणार होतात का? तुम्ही तसा प्लॅन आखला होता का, असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला. मात्र, संजय राऊतांनी हा दावा फेटाळला. परंतु, दुसऱ्याच क्षणाला राऊतांनी सूचक वक्तव्य करून याबाबतची उत्कंठा आणखी वाढवली. संजय राऊत यांनी म्हटले की, सुनील राऊत माझ्यासोबतच आहेत. तुम्ही त्यांना पाहतच असाल. तेच सर्व मोर्चा सांभाळत आहेत, असे राऊत यांनी म्हटले. पण तुम्हाला काय होईल,ते लवकरच कळेल. या सगळ्याचा उलगडा लवकरच होईल, अशी पुस्ती संजय राऊत यांनी जोडली.
बाप बदलण्याची भाषा कोण करतंय पाहा; गुलाबराव पाटलांचा जुना व्हिडिओ ट्विट करत राऊतांचा घणाघात
या पत्रकार परिषदेवेळी सुनील राऊतही उपस्थित होते. प्रसारमाध्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी सुनील राऊत यांनी, मी बाळासाहेब ठाकरेंचा कट्टर शिवसैनिक असल्याचे सांगितले. तसेच मी कुठेही जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. शिवसेनेचे जितके आमदार वाचतील त्यांना घेऊन आम्ही महाराष्ट्रात पक्ष वाढवू. नारायण राणे, छगन भुजबळ आणि राज ठाकरे हे पक्ष सोडून गेल्यानंतरही शिवसेना वाढली. शिवसेनेचे ५६ आमदार आहेत, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली ते आगामी काळात १०० च्या वर जातील, असा दावाही सुनील राऊत यांनी केला. मात्र, शिवसेनेतील इतके सगळे लोक एकनाथ शिंदे गटात जात असताना तुमच्या मनात तशी भावना निर्माण होत नाही का, असा प्रश्न सुनील राऊत यांना विचारण्यात आला. तेव्हा सुनील राऊत यांनी म्हटले की, तुम्ही पूर्वीची वक्तव्यं तपासून बघा, हेच लोक सांगत होते की, भाजप शिवसेनेला संपवत आहे. भाजपने शिवसेनेचे लोक पाडले. याच लोकांच्या सांगण्यावरून उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत गेले, अशी टीका सुनील राऊत यांनी केली.
Shahaji Bapu Patil: ‘मी जिवंत असेपर्यंत उद्धव ठाकरेच माझे नेते राहतील’, शहाजी पाटलांचा व्हिडिओ व्हायरल
‘मनसेचा मुख्यमंत्री होणार असेल तर ती ऐतिहासिक घटना’

शिंदे यांची काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा झाल्याने याबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहेत. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. एकनाथ शिंदे यांनी मनसेतही जावं आणि त्यामुळे जर मनसेचा मुख्यमंत्री होणार असेल तर ऐतिहासिक गोष्ट घडेल,’ असं उपरोधिक भाष्य संजय राऊत यांनी केलं आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : is shivsena leader sunil raut planning to join eknath shinde camp sanjay raut reaction
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

100 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here