मुंबई: अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या लग्नाला दोन महिने पूर्ण झाले आहेत. आलिया भट्ट हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना गुड न्यूज (Alia Bhatt Expecting a Baby) दिली आहे. अभिनेत्रीने हॉस्पिटलमधील एक फोटो शेअर केला असून त्यावर अशी कॅप्शन दिली आहे की, ‘आमचं बाळ… लवकरच येणार’. अभिनेत्रीने जो फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये तिने सोनोग्राफीचा फोटो शेअर केला आहे, तिच्या शेजारी रणबीर बसल्याचे दिसत आहे. रणबीर आणि आलिया भट्ट लवकरच आई-बाबा होणार असल्याची गुड न्यूज मिळाल्यानंतर चाहत्यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे.


अभिनेत्रीच्या पोस्टवर बॉलिवूडमधील सेलिब्रिटी आणि चाहतावर्गाकडून कौतुकाचा वर्षाव होता. रणबीरची बहीण रीधिमा कपूर हिने देखील यावर कमेंट केली आहे. शिवाय तिने इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत या कपलला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘माझ्या बाळांना आता बाळ होणार आहे…’, अशी कॅप्शन तिने फोटो पोस्ट करत दिली आहे. तर आलिया भट्टची आई सोनी रझदान यांनी अशी कमेंट केली आहे की, ‘Congratulations Mama and Papa lion’. आलियाच्या आयुष्यातील आणखी एक महत्त्वाची व्यक्ती म्हणजे करण जोहर आणि त्याने अशी कमेंट केली आहे की, ‘Heart is Bursting’. इतरही बड्या सेलेब्सनी आलिया-रणबीरला शुभेच्छा दिल्या आहेत.

Ridhima Kapoor Post For Alia-Ranbir

अभिनेता रणबीरने एका मुलाखतीमध्ये गंमतीत बोलताना काही खुलासे केले होते. त्याने सांगितले होते की तो लवकरच टॅटू काढणार आहे. हा टॅटू एकतर त्याचा लकी नंबर ८ चा असेल किंवा त्याच्या मुलांच्या नावाचा असेल. रणबीरने १४ एप्रिल २०२२ रोजी आलियाशी लग्न केले. लग्नानंतर दोघेही आता ९ सप्टेंबरला प्रदर्शित होणाऱ्या ‘ब्रह्मास्त्र’मध्ये दिसणार आहेत. रणबीर आणि आलियासाठी हा चित्रपट खूप खास आहे कारण याच्या शूटिंगदरम्यान दोघेही एकमेकांच्या जवळ आले आणि त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here