दलबीर कौर यांचे शनिवारी रात्री म्हणजेच २५ जूनच्या रात्री निधन झाले. त्यांना अमृतसर येथील एका खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते आणि तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रणदीपला जेव्हा ही बातमी समजली तेव्हा तो हातातली सर्व कामं सोडून दलबीर यांच्या पार्थीवाला खांदा देण्यासाठी आणि अंत्यसंस्कारासाठी तिथे गेला.
दलबीर यांच्यावर रविवारी (२६ जून) भिखीविंडमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. दलबीर यांच्या कुटुंबियांनाही रणदीप हुड्डा येईल अशी अपेक्षा नव्हती. रणदीप भिखीविंडला पोहोचला, त्याने दलबीर यांच्या कुटुंबियांचं सांत्वन तर केलं आणि दलबीर यांना अखेरचा निरोपही दिला. रणदीपने सरबजीत यांच्या बहिणीच्या मृतदेहाला फक्त खांदाच दिला नाही तर मुखाग्नीही दिली.

बायोपिकमध्ये केली होती सरबजीतची भूमिका, बरेच दिवस उपाशी राहिला, १८ किलो वजन कमी केलं
रणदीप हुड्डाने २०१६ मध्ये आलेल्या ‘सरबजीत’ चित्रपटात दलबीर यांचा भाऊ सरबजीतची भूमिका साकारली होती. सरबजीत अनेक वर्ष पाकिस्तानच्या कोट कालाखापत तुरुंगात बंद होते. बहीण दलबीर यांनी पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या भावाला परत आणण्यासाठी आयुष्याशी अनेक वर्ष लढली. भाऊ- बहिणीचा हा संघर्ष आणि त्यांचे नाते ‘सरबजीत’ चित्रपटात दाखवण्यात आला होता. चित्रपटात रणदीप हुड्डा सरबजितच्या भूमिकेत होता, तर ऐश्वर्या राय- बच्चनने त्याची बहीण दलबीर कौरची भूमिका साकारली होती.
वडिलांच्या दुसऱ्या लग्नावर अर्जुन कपूरने दिलेली प्रतिक्रिया
असे भावूक दलबीर म्हणाले होते, रणदीपने वचन दिले होते
याच चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चला दलबीर कौर देखील उपस्थित होत्या आणि रणदीपला सरबजीतच्या भूमिकेत पाहून त्या भावूक झालेल्या. तेव्हाच तिने रणदीपकडून वचन घेतले की तो त्यांच्या पार्थिवाला खांदा देईल. दलबीर कौर म्हणाल्या होत्या की, ‘मला रणदीपला सांगायचे आहे की मी माझा भाऊ सरबजीत त्याच्यामध्ये पाहिला आहे. माझी एक इच्छा आहे. मी रणदीपकडून एक वचन घेऊ इच्छितो की, मी मरेन तेव्हा त्याने मला खांदा द्यावा. भावाने मला खांदा दिला या विचाराने माझ्या आत्म्याला शांती लाभेल. मला माझा भाऊ रणदीप मिळाला याचा मला खूप आनंद आहे. चित्रपटात तो केवळ नायकच नाही तर माझा भाऊही आहे.’