मनमाड : नदीतून वाहणारं पाणी अचानक लाल रंगाचं झालं तर? ही कल्पनाही आपल्याला विचारात पाडते. पण महाराष्ट्रातलं एक असं गाव आहे जिथे थेट नदीपात्रात रक्तमिश्रित पाणी वाहत असल्याचं समोर येत आहे. मालेगाव शहरातून वाहणाऱ्या मोसम नदीच्या सांडव्या पुलावरून रक्तमिश्रित पाणी वाहत असल्याने एकच खळबळ उडाली आहे.
रक्तमिश्रित पाण्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली असल्याने या परिसरातील नागरिकांनी मनपा प्रशासना विरोधात नाराजी व्यक्त केली. मनपा प्रशासनाला वारंवार या विषयी तक्रारी करूनसुद्धा त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला. मनपा त्वरित याकडे लक्ष देऊन संबंधित कत्तलखाना चालकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.