सध्या न्यायालयाने आरोपी व्यवस्थापकाला १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. एफआयआरमध्ये बँकेच्या सहायक शाखा व्यवस्थापक आणि लिपिकाच्या नावाचाही समावेश करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फसवणुकीची ही घटना १३ ते १९ मे दरम्यान घडली. चौकशीदरम्यान बँकेचे व्यवस्थापक हरिशंकर यांनी सांगितलं की, सायबर गुन्हेगारांनी त्याला डेटिंग अॅप्लिकेशन वापरण्याचं आमिष दाखवलं. मॅनेजरच्या या बोलण्यात कितपत तथ्य आहे? याचा पोलीस तपासात करत असल्याची माहिती आहे.
आरोपी अधिकाऱ्याकडून ग्राहकांच्या कागदपत्रांमध्ये छेडछाड
दाखल केलेल्या एफआयआरनुसार, एका महिला ग्राहकाने बँकेत मुदत ठेव म्हणून १.३ कोटी रुपये जमा केले होते आणि नंतर याच ठेवीच्या आधारे महिलेने ७५ लाखांचे कर्जही घेतले होते. आवश्यक ती सर्व कागदपत्रे ग्राहकाने सादर केल्याचा आरोप आहे. परंतु, आरोपी अधिकाऱ्यांनी कागदपत्रांमध्ये छेडछाड करून त्यांचा सुरक्षा म्हणून वापर केल्याचा आरोप आहे. इतकंच नाहीतर आरोपींनी ओव्हरड्राफ्ट म्हणून ५.७ कोटी रुपये जारी केले.