सातारा : साताऱ्यातील पुसेगावमध्ये बाळासह कार हायजॅक करण्याचा प्रयत्न झाला. ही घटना फिल्मी स्टाईलमध्ये घडली आहे. २५ जूनच्या रात्री अॅड. महेश गोरे हे आपल्या कुटुंबासह शिखर शिंगणापुरहून पुसेगाव मार्गे साताऱ्याला येत असताना पुसेगावमध्ये रात्री पाणी घेण्यासाठी गाडी थांबली. यावेळी महेश गोरे हे गाडीतून उतरुन पाणी घेण्यासाठी गेल्यावर लगेच एका चोरट्याने गाडीचा ताबा मिळवत गाडी ‘हायजॅक’ (Car Hijacked in Satara) केली.

विशेष म्हणजे या हायजॅक केलेल्या गाडीत महेश गोरे यांची बायको, अॅड जयश्री गोरे आणि त्यांचं ४ महिन्याचं बाळ तसेच त्यांची भाची होती. गाडीत कोणीच पुरुष दिसत नसल्याचं बघत ही गाडी पळवून नेण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला. चोरट्याने गाडीत बसून गाडी जोरदार वेगात साताऱ्याच्या दिशेने निघाला. यावेळी जयश्री फडतरे यांनी लगेच हँण्डब्रेक ओढला. मात्र, तरी सुद्धा या चोरट्याने गाडी जोरात चालवत त्यांना शांतबसा नाहीतर मारुन टाकेन अशी दमदाटी केली.

मैत्रीचा धक्कादायक शेवट! मित्राला वाचवायला गेला पण दोघेही परतले नाहीत…
यावेळी सुद्धा ४ महिन्याचं बाळ मांडीवर घेवून जयश्री गोरे यांनी त्याला लाथा बुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. या झटापटीत बाळ मांडीवरून खाली पडलं. मात्र, गाडीच्या मागच्या सीटवर बसलेल्या त्यांच्या भाचीने बाळ लगेच उचललं‌. बाळ सुखरुप आहे, हे पाहताच जयश्री यांनी त्या चोरट्याला अजून जास्त जोराने प्रतिकार करत पुन्हा लाथा बुक्यांनी मारहाण केली.

या झटापटीत गाडी बाजुच्या लाकडाच्या ढिगाऱ्यावर जावून थांबली. यामुळे गांगरलेल्या चोराने दार उघडून तेथून पळ काढला. काही वेळाने जयश्री यांचे पती महेश गोरे हे काही स्थानिकांना घेवून गाडी जवळ पोहचले. मात्र, तोपर्यंत चोरटा पळून गेला होता. या घटनेबाबत पुसेगाव पोलीस स्टेशनला माहिती दिल्यानंतर काहीच वेळात पोलिसांनी अभिजीत फडतरे या पुसेगाव जवळील नेर फडतरवाडीच्या चोराला अटक केली.

सुमारे ५ ते ७ मिनिटं चाललेल्या या झटापटीमध्ये बाळासाठी आईने केलेला प्रतिकार हा महत्वाचा होता. आई आपल्या बाळासाठी मोठ्यातल्या मोठ्या संकटाला तोंड देवू शकते. हेच या प्रसंगातून दिसून आलं.

एकनाथ शिंदे तळ ठोकून असलेल्या गुवाहाटीमधील ‘रेडिसन ब्ल्यू’ हॉटेलचा मोठा निर्णय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here