मयत देवराम शिंगाडे हे अनेक वर्षापासून शेतीसह पशू व्यवसाय सुद्धा करायचे. या वर्षी तीन एकर जागेत उन्हाळी धानाची रोवणी करून त्यावर जवळपास ६० हजार रुपयांच्या वर खर्च केला. यासाठी सहकारी संस्थेच्या जवळपास ५५ हजार रूपयांचे कर्जही घेतले. मात्र, दिवसरात्र मेहनत करूनही तीन एकरात केवळ १५ पोती धान्य उत्पादन झाले असल्याने देवरामच्या यांच्या मनावर विपरीत परिणाम झाला. गेल्या चार-पाच दिवसांपासून ते आर्थिक विवंचनेत सापडले होते.
दरम्यान, देनराम यांनी गावाशेजारी असलेल्या शेतावरील विहिरीत नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली. देवराम यांनी आत्महत्या केल्याची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली असता परिसरातील नागरिकांनी एकाच गर्दी केली होती. लाखांदूर पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी जावून घटनेचा पंचनामा केला असून मृतदेह शव विच्छेदना साठी लाखांदूर येथे पाठविण्यात आले. पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.