हिंगोली: शिवसेनेत मोठी बंडाळी झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील आमदारांसोबत मिळून मोठा बंड केला आहे. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार अस्थिर झालं आहे. पण, आजवर ज्या आमदार आणि खासदारांनी आत्तापर्यंत शिवसेना सोडली त्यांना परत कधी गुलाल लागला नाही, असे वक्तव्य परवा कळमनुरी विधानसभा मतदार संघाचे आमदार संतोष बांगर यांनी केली होते. त्यांचे हे वक्तव्य हिंगोली जिल्ह्यातील शिवसेना सोडलेल्या आमदार व खासदारांना लागू होत आहे.

कारण, आत्तापर्यंत हिंगोली जिल्ह्यात ज्यांनी ज्यांनी शिवसेना सोडली त्यांना मात्र कधी गुलाल लागलाच नाही. यातील मूर्तिमंत उदाहरण सांगायचं म्हटलं तर शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी माने यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर परत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. परंतु त्यांना यश मिळाले नाही. माने हे शिवसेनेच्या तिकिटावर १९९६ ते १९९९ पर्यंत खासदार राहिलेले आहेत.

Shivaji Mane

शिवाजी माने

सुभाष वानखेडे शिवसेना माजी खासदार यांनी सुद्धा शिवसेना सोडून काँग्रेसच्या तिकिटावर खासदार की लढवली, परंतु त्यांनाही गुलाल लागला नाही. वानखेडे हे १९९५ ते २००९ पर्यंत आमदार व २००९ ते २०१४ पर्यंत तिच्या तिकिटावर खासदार राहिलेले आहेत.

Subhash Wankhede

सुभाष वानखेडे

यांचे सहकारी मित्र असलेले कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे माजी आमदार गजानन घुगे यांनीसुद्धा शिवसेना सोडल्यानंतर परत त्यांना गुलाल लागला नाही. घुगे हे १९९९ ते २००९ पर्यंत शिवसेनेच्या टिकटावर आमदार झालेले आहेत.

gajanan ghuge

गजानन घुगे

यापूर्वीच्या काळाचा विचार केला तर विलास गुंडेवार यांनी १९९१ मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर खासदार की निवडून येऊन शरद पवार यांच्यासोबत काँग्रेसमध्ये प्रवेश केला व त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये गेले.

vilas gundewar

विलास गुंडेवार

अशीच परिस्थिती १९८० मध्ये कळमनुरी विधानसभा मतदारसंघात मारोतराव शिंदे यांच्यासोबत १९८० मध्ये झाली. जिल्ह्यात या पाच आमदार व खासदारांना परत कधी गुलाल मात्र लागला नाही.

बंडखोर आमदार बालाजी कल्याणकरांच्या केसालाही धक्का लागणार नाही | प्रताप पाटील चिखलीकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here