मुंबई: बॉलिवूडमध्ये सध्या चित्रपटांपेक्षा सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याची जास्त चर्चा सुरू आहे. त्यात सर्वात वरच्या स्थानावर आहेत सर्वांचे लाडके आलिया भट्ट आणि रणबीर कपूर. गेल्या काही वर्षांपासून चाहते ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण एप्रिल महिन्यात आला आला आणि आलिया-रणबीर विवाहबंधनात अडकले.त्यानंतर दोघांनी आता चाहत्यांना मोठा सुखद धक्का देत गुडन्यूज शेअर केली आहे. आलिया आणि रणबीरच्या आयुष्यात नवा पाहुणा येणार आहे.
एक खास पोस्ट करत आलियानं चाहत्यांसोबत ही गोड बातमी शेअर केली. ‘आमचं बाळ… लवकरच येणार’. असं आलियानं तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. यानंतर चाहते आणि नेटकऱ्यांकडून दोघांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तर मीम्स देखील व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी मीम्सच्या माध्यमातून आलिया आणि रणबीरचं अभिनंदन केलं आहे.
सेलिब्रिटींनी दिल्या शुभेच्छा
बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींंनी आलिया आणि रणबीरचं अभिनंदन केलं आहे. रणबीरची बहीण रिद्धिमा कपूरनं देखील खास स्टोरी शेअर केलीए. माझ्या बाळांना आता बाळ होणार असल्याचं तिनं पोस्टमध्ये म्हटलं आहे.
काय म्हणाली आलियाची बेस्ट फ्रेंड?
आलियाची बेस्ट फ्रेंड आकांक्षा रंजन कपूर हिनं देखील आलियाचा फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत.