बीड नगरपालिकेचा गलथान कारभार वरचेवर वाढत चालला आहे. यामध्ये लोकांचं लक्ष वेधण्यासाठी नेहमीच कोणती ना कोणते पर्व आणून लोकांची दिशाभूल सत्ता भोगणारे करत आहेत गेल्या ४० वर्षात सत्ता भोगून देखील बीड शहरामध्ये विकासाच्या नावाखाली कोणताच विकास झाला नाही. जो झाला तो कागदोपत्रीच, ज्या विकासाच्या गोष्टी नगरपालिकेचे आजी-माजी करतात त्यांच्या भूलथापांना नागरिकांनी आता बळी पडू नये यासाठी हे लक्षवेधी आंदोलन करण्यात आलं आहे, असंही ढवळे यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, मान्सूनपूर्व स्वच्छता कागदोपत्रीच दाखवून अपहार, रस्त्यांना तलावाचे स्वरूप, नागरिकांना माफक दरात होडीसाठी कर्ज देऊन बीड नगरपालिकेला ग्रामपंचायतीचा दर्जा देण्यात यावा या मागणीसाठी ‘लक्षवेधी होडी आंदोलन’ करण्यात आले.
आंदोलनातील प्रमुख मागण्या :-
१) बीड शहरातील मान्सूनपूर्व स्वच्छता भ्रष्टाचार प्रकरणात गुन्हे दाखल करा.
२) नदी, नाले, ओढे बिंदुसरा, करपरा नदीपात्रातील अतिक्रमित बांधकाम प्रकरणात गुन्हे दाखल करा.
३) ओडीएफ प्लस प्लस मानांकन प्राप्त नगरपालिकेला ग्रामपंचायतीचा दर्जा द्या.
४) करोनाकाळात दंडवसुली प्रकरणात पावत्या व लाखो रूपयांच्या अपहार प्रकरणात गुन्हे दाखल करा.