विधान परिषद निवडणूक झाल्यानंतर शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार सूरतला पोहोचले. दिवसभर त्यांच्या मुक्काम एका हॉटेलमध्ये होता. दुसऱ्या दिवशी त्यांनी हॉटेल सोडलं आणि गुवाहाटीला प्रयाण केलं. मात्र सूरतमधील हॉटेलचं बिल अद्याप थकित आहे.

हायलाइट्स:
- शिंदे यांचा मुक्काम असलेल्या सूरतमधील हॉटेलचं बिल थकित
- सरकारी अधिकाऱ्यांनी आमदारांसाठी बुक केल्या होत्या खोल्या
- हॉटेल सोडून ५ दिवस उलटूनही बिल शिल्लक
२० जूनला विधान परिषदेची निवडणूक झाली. याच रात्री शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांचा गट गुजरातच्या मॅरिडियन हॉटेलमध्ये पोहोचला. शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार गुजरातला गेल्याचं वृत्त २१ जूनला सकाळी समोर आलं. त्यानंतर एकच खळबळ उडाली. शिंदे यांचा गट २२ जूनला आसामच्या गुवाहाटीत पोहोचला. तेव्हापासून त्यांचं वास्तव्य रॅडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये आहे. मात्र मॅरिडियन हॉटेल सोडून ५ दिवस झाले असले तरीही हॉटेलचं बिल थकितच आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या हॉटेलच्या खोल्या काही सरकारी अधिकाऱ्यांनी बुक केल्या होत्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेलचे बिल अद्याप भरलेले नाही. या हॉटेलमधील खोल्या ए, बी किंवा एबी व्यक्तीच्या नावाने बुक केल्या होत्या. रूम बुक करताना कोणतीही कागदपत्रं दिली नाहीत. त्यानंतर बंडखोर आमदार सुरतहून थेट गुवाहाटीला रवाना झाले. मात्र त्यांचे सुरतमध्ये राहण्याचे बिल अद्याप थकित आहे.
२२ जूनच्या सकाळी शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार गुवाहाटीला पोहोचले. त्यांना आसाम पोलिसांनी सुरक्षा पुरवली. पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात ते हॉटेल रॅडिसन ब्ल्यू येथे पोहोचले. तेव्हापासून त्यांचा मुक्काम याच हॉटेलमध्ये आहे. पुढील रणनीती ठरवण्यासाठी बैठकांचं सत्र सुरू आहे. या आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढला आहे. त्यामुळे सरकार अल्पमतात आलं आहे.
गुवाहाटीत एकनाथ शिंदेंचं 42 आमदारांसह शक्तिप्रदर्शन; हॉटेलमध्ये शिंदे समर्थकांचे फोटोसेशन
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : who are the officials who booked rooms in surat for the rebel mlas of maharashtra bill still pending
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network