मुंबई : राज्यात मुंबई, पुण्यासह अनेक भागांमध्ये मान्सून पुन्हा सक्रीय होत आहे. अशात हवामान खात्याकडून राज्यासाठी पुढचे ५ दिवस जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यानुसार, पुढील ३-४ तासात रत्नागिरी जिल्ह्यांतील काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याकडून कोकणासह घाट परिसर असलेल्या भागांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील ३ ते ४ तासांत सिंधुदुर्ग, ठाणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील काही ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाची शक्यता आहे. रायगडलाही याचा फटका बसण्याची दाट शक्यता आहे. मुंबई, ठाण्यात अंशतः ढगाळ वातावरण असून हलक्या पावसाच्या सरी कोसळतील. यामुळे नागरिकांनीही हवामानाचा अंदाज घेत घराबाहेर पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

एकनाथ शिंदे तळ ठोकून असलेल्या गुवाहाटीमधील ‘रेडिसन ब्ल्यू’ हॉटेलचा मोठा निर्णय
दरम्यान, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, विदर्भामध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे तर मध्य महाराष्ट्रातही विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला. हवामान खात्याकडून पुढचे पाच दिवस पाऊस राहिल अशी माहिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी पावसाचा अंदाज घेत घराबाहेर पडण्याच्या सूचना आहेत.

ठाणे, पालघर, मुंबई, रायगड, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली इथे सध्या जोरदार पाऊस सुरू आहे, अशात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.

महाराष्ट्र हादरला! ४ महिन्याच्या बाळासह कार ‘हायजॅक’, चिमुकल्यासाठी आई झाली हिरकणी अन्…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here