मुंबई: महा मिनिस्टर या झी मराठीवरील (Maha Minister 2022) कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा रविवारी पार पडला. या सोहळ्यामध्ये रत्नागिरीच्या लक्ष्मी ढेकणे (Lakshmi Dhekane) यांनी बाजी मारली. लक्ष्मी यांनी ११ लाखांची पैठणी जिंकली. या सोहळ्याबाबत सुरुवातीपासून विशेष चर्चा झाली, मात्र विजेतीला ११ लाखांची पैठणी मिळणार हे म्हटल्यावर ‘महा मिनिस्टर’ हा कार्यक्रम विशेष चर्चेत आला होता.

Lakshmi Dhekane

लक्ष्मी ढेकणे, रत्नागिरी

११ लाखांची पैठणी कशी असणार, त्यावर काय नक्षीकाम असणार, सोन्याची जर कशी असणार इ. हे आणि असे अनेक प्रश्न होम मिनिस्टरच्या चाहत्यांना पडले होते. अखेर लक्ष्मी यांनी ही साडी जिंकली आणि ती नेसून त्यांनी कॅमेऱ्यासमोर पोजही दिल्या. या साडीमध्ये त्यांचं सौंदर्य विशेष खुलून दिसतंय.

Lakshmi Dhekane 11 Lakh Paithani Saree

लक्ष्मी ढेकणे यांनी जिंकलेली ११ लाखाची पैठणी

कशी आहे ही ११ लाखांची पैठणी?
लक्ष्मी यांनी जिंकलेल्या ही लाल रंगाची पैठणी अगदी पारंपरिक आहे. त्यावर फुला-पानांचे बारीक नक्षीकाम, नाचणारा मोर, हिरे आणि अस्सल सोन्याची जर आहे. पूर्ण साडीवर अशाप्रकारचे सुंदर नक्षीकाम करण्यात आले आहे. कापसे पैठणी फाउंडेशन, येवला यांच्यातर्फे ही पैठणी तयार करण्यात आली आहे. येवल्याची एक तरी पैठणी Wardrobe मध्ये असावी असं स्वप्न अनेक महिलांचं असतं, त्यामुळे लक्ष्मी यांनी जिंकलेली ११ लाखांची पैठणी खास ठरतेय.

पाहा कशी आहे महा मिनिस्टर २०२२ ची महापैठणी

लाखमोलाच्या हातांनी तयार केली पैठणी
काही दिवसांपूर्वी झी मराठीच्या (Zee Marathi) सोशल मीडिया पेजवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. ज्यामध्ये आदेश बांदेकर कशी तयार झाली ११ लाखांची पैठणी असा सवाल व्हिडिओच्या सुरुवातीला विचारतात. येवल्यात पोहोचल्यानंतर ही पैठणी कशी तयार होतेय हे पाहिल्यावर स्वत: आदेश बांदेकर थक्क झाले होते. ही ११ लाखांची पैठणी दिव्यांग कलाकारांच्या मेहनतीमधून तयार झाली आहे. बोलू किंवा ऐकू न शकणाऱ्या पण हातांमध्ये कला असणाऱ्या या अवलियांनी ही पैठणी तयार केली आहे.

‘पैठणीला अस्सल सोन्याची जर आणि हिरे असले तरी दिव्यांग कलाकारांच्या कौशल्यामुळे पैठणीचं तेज अधिक वाढलं आहे’, अशी प्रतिक्रिया या व्हिडिओतून आदेश बांदेकर यांनी दिली होती. याशिवाय त्यांनी ११ लाखांच्या पैठणीमुळे अशा व्यक्तींना रोजगार मिळाल्याचा आनंदही त्यांनी व्यक्त केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here