maharashtra political crisis: १६ आमदारांना निलंबित करू नका, असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. शिंदे गटाला त्यामुळे ११ जुलैपर्यंत मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र राजकीय घडामोडी वेगानं घडत आहेत. सरकारविरोधात विश्वासदर्शक ठरावा आणला जाऊ शकतो.

हायलाइट्स:
- ठाकरे सरकारविरोधात विश्वासदर्शक ठराव आणला जाण्याची शक्यता
- शिंदे गट मतदानाला अनुपस्थित राहिल्यावरही सरकार अडचणीत
- भाजपकडे आवश्यक संख्याबळ; सरकार येऊ शकतं
गेल्याच आठवड्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाली. उपचार घेऊन ते परतले आहेत आणि ऍक्टिव्ह मोडमध्ये आहेत. सरकार अल्पमतात असल्याचं त्यांना वाटल्यास ते सरकारला पत्र देतील आणि विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं. या परिस्थितीत दोन महत्त्वाच्या शक्यता आहेत आणि या दोन्हीमध्ये सरकार टिकणं अवघड दिसत आहे.
पहिली शक्यता काय?
एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे दोन तृतीयांश आणि १० अपक्ष आमदार आहेत. शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेले आमदार राज्यात आल्यास आणि त्यांनी विश्वासदर्शक ठरावावर मतदान केल्यास सरकार सहज कोसळेल. कारण काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि त्यांच्या समर्थक लहान पक्षांकडे संख्याबळ नाही.
दुसरी शक्यता काय?
शिंदे यांच्यासोबत असलेले शिवसेनेचे बंडखोर आमदार विश्वासदर्शक ठरावाला अनुपस्थितीत राहतील अशी दुसरी शक्यता आहे. शिंदे यांच्यासोबत सेनेचे ३९ आमदार आहेत. त्यामुळे बहुमताचा आकडा जवळपास १२५ पर्यंत खाली येईल. अशा परिस्थितीत भाजपकडे १२८ इतकं संख्याबळ आहे.
भाजपसोबत किती आमदार?
शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेले सेनेचे आमदार मुंबईत न आल्यासही ठाकरे सरकार अडचणीत येईल आणि ठाकरेंची खुर्ची जाईल. भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांकडे ११२ आमदार आहेत. बहुजन विकास आघाडीचे ३, शेकापचा १, शिंदे गटातील १० अपक्ष आणि इतर २ अपक्ष यांच्या मदतीनं भाजपचा आकडा १२८ पर्यंत जातो. त्यामुळे भाजपकडे आवश्यक संख्याबळ आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : maharashtra political crisis what will happen if rebel shiv sena mlas remain absent while no confidence motion
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network