‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आम्हाला वेळ देत नव्हते, आम्हाला निधी मिळत नव्हता असा आरोप संजय शिरसाट यांनी केला होता. त्यांच्या याच आरोपाला प्रतिउत्तर देतांना अंबादास दानवे यांनी फेसबुक पोस्ट करत म्हटलं आहे की, ‘पोस्ट टाकायला थोडा उशिरच झाला. तरीही ‘संजय शिरसाट यांनी पहिले सांगावे तुमचा ईमान कितीला विकला गेला?’, अगदी मुख्यमंत्री, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट नाही होत, निधी नाही मिळाला असा आरोप केला आहे. माझ्या सोबत स्वतः मुख्यमंत्रीसाहेबांची आपण मागच्या काही दिवसात आपल्या मतदार संघाच्या कामासंदर्भात भेट घेतली. त्यामुळे बंडखोरी केल्यानंतर सोशल मीडिया हैंडलवर मुख्यमंत्री साहेब सोबतचे फोटो डिलेट करु शकता, कमेंट सेक्शन बंद करु शकतात. पण संभाजीनगरला आल्यावर शिवसैनिकांना सामोरे नाही जाऊ शकत, असं फेसबुकद्वारे म्हणाले आहेत.
या प्रश्नांची उत्तर तुम्हाला देता येतील का?
याचवेळी अंबादास दानवेंनी शिरसाट यांना काही प्रश्न विचारले असून, याचे तुम्हाला देता येईल का? असंही म्हटलं आहे. ज्यात तुमच्या कार्यालयाच उद्धघाटन कोणी केलं?, मागच्या काही दिवसापूर्वी मंत्रालय येथे झालेल्या पाणीपुरवठा बैठकीला तुम्ही होता का नाही?, वर्षा निवासस्थानी स्नेहभोजनाला होता का नाही? आणि सर्वात महत्वाच जो हजारो कोटी विकास निधी तुमच्या मतदारसंघात मागच्या अडीच वर्षात दिला गेलाय तो तुमची प्रॉपर्टी विकून किंवा रिक्षा चालवून आलेल्या पैशातून केलाय का?, असा प्रश्न दानवे यांनी फेसबुकवर उपस्थित केला आहे.