जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर कार्ला फाट्याजवळ शिलाटणे गावच्या हद्दीत बाईकचा आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात बाईककवर असलेल्या तीन वर्षांच्या बालकासह आईचा जागीच मृत्यू झाला असून, वडील गंभीर जखमी झाले आहेत.

हायलाइट्स:
- भीषण अपघातात तीन वर्षांच्या बालकासह आईचा जागीच मृत्यू
- मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर झाला अपघात
- वडील गंभीर जखमी
लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवन शर्मा हे त्यांच्या मोटारसायकलने (क्र.एमएच १४ जेझेड १९८४) त्यांची पत्नी पुष्पा व त्यांचा तीन वर्षाचा लहान मुलगा युवराज हे तिघे लोणावळ्यात फिरायला आले होते. लोणावळ्यात फिरून झाल्यानंतर ते पुन्हा निगडीला घरी चालले होते. कार्ला फाट्याजवळ शिलाटणे गावच्या हद्दीत त्यांच्या मोटारसायकलला मागून भरधाव वेगात आलेल्या कंटेनरने (क्र.एमएच १४ जेझेड १९८४) जोरात धडक दिली. या भीषण धडकेत मोटारसायकलवरील तीन वर्षांच्या बालक आणि त्याची आई व वडील मोटारसायकलसह मार्गावर फेकले गेले.
या भीषण घटनेत युवराज व त्याची आई पुष्पा यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला झाला. तर वडील पवन शर्मा हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी करून अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. त्यापूर्वी स्थानिकांनी जखमी झालेल्या पवन शर्मा यांना उपचारासाठी कामशेत येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. अपघातानंतर कंटेनर चालक घटना स्थळावरून पळून गेला आहे. या घटनेचा पुढील तपास लोणावळा ग्रामीणचे पोलीस कर्मचारी शरद जाधव हे करीत आहेत.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : mumbai-pune national highway accident a three-year-old boy and his mother died on the spot
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network