दरम्यान, ऐन रात्री दुकाने बंद करण्याची वेळ असतानाच जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने अनेकजण पावसात अडकून पडले. बाजार परिसरात पाणी साचल्याने नागरिकांची धावपळ उडाली. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याला पावसाची प्रतीक्षा लागली असतानाच आकाशात जमणारे ढग हुलकावणी देऊन जात होते. त्यामुळे पेरणी राहिलेल्या व पेरणी आटोपलेल्या शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त केली जात होती. आज सोमवारी रात्री झालेल्या पावसामुळे दिलासा मिळाला आहे.
२७ जून ते १ जुलै दरम्यान पावसाचा अंदाज
भारतीय हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून प्राप्त अंदाजानुसार आज २७ जून ते १ जुलै या दरम्यान अकोला जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. अनेक ठिकाणि ५० ते ७५ मि.मी पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. वीज पडणे या अनुषंगाने नागरिकांनी अधिक दक्षता घ्यावी. दामिनी या ऍपचा वापर करुन माहिती घ्यावी. तसेच या इशाऱ्याच्या पार्श्वभुमिवर सर्व यंत्रणांनी योग्य ती दक्षता व खबरदारी घ्यावी असे कळविण्यात आले आहे.