Maharashtra political crisis | अशातच मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी एक सूचक ट्विट करून ही उत्कंठा आणखीच वाढवली आहे. अमेय खोपकर यांनी सोमवारी रात्री एक ट्विट केले होते. यामध्ये म्हटले होते की, ‘असा हा ‘धर्मवीर’… एक ‘राज’ की बात उद्या शेअर करणार आहे. पिक्चर अभी बाकी है!’. राजकीय वर्तुळात अमेय खोपकर यांच्या या वक्तव्याचे निरनिराळे अर्थ काढले जात आहेत.

हायलाइट्स:
- आमदारांना पक्षांतरबंदी कायद्यामुळे अद्यापही अपात्रतेच्या कारवाईची भीती
- एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात नुकतेच फोनवर बोलणे झाले होते
- एकनाथ शिंदे हे वेळ पडल्यास आपला गट मनसेत विलीन करू शकतात
अशातच मनसेचे नेते अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी एक सूचक ट्विट करून ही उत्कंठा आणखीच वाढवली आहे. अमेय खोपकर यांनी सोमवारी रात्री एक ट्विट केले होते. यामध्ये म्हटले होते की, ‘असा हा ‘धर्मवीर’… एक ‘राज’ की बात उद्या शेअर करणार आहे. पिक्चर अभी बाकी है!’. राजकीय वर्तुळात अमेय खोपकर यांच्या या वक्तव्याचे निरनिराळे अर्थ काढले जात आहेत. खोपकर म्हणतात त्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांच्या बंडनाट्यात आगामी काळात खरंच राज ठाकरे यांची काही भूमिका असू शकते का, याविषयी सर्वांना उत्सुकता लागली आहे.
एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना दोनवेळा फोन
एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना अक्षरश: खिळखिळी झाल्याचे चित्र दिसत आहे. शिवसेनेच्या एकूण ५५ आमदारांपैकी ४० पेक्षा जास्त आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. अशातच आता एकनाथ शिंदे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांना फोन केल्याची माहिती समोर आली होती. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि राज ठाकरे यांच्यात दोनवेळा फोनवर बोलणे झाले आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पायावर नुकतीच शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळे राज यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी त्यांना फोन केल्याचे समजते. यावेळी एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीबाबतही चर्चा झाल्याचे समजते.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Marathi News from Maharashtra Times, TIL Network