अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांनी देखील या कायद्याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिनं देखील ही पोस्ट शेअर करत गर्भपाताचा जो कायदा आहे त्याच्याविरोधात प्रतिक्रिया दिली आहे. प्रियांका आता आंतरराष्ट्रीय पातळीवरची कलाकार आहे. त्यामुळं तिच्या वक्तव्याची नेहमीच दखल घेतली जाते. जागतिक स्तरावर घडणाऱ्या अनेक घटनांवर तिनं केलल्या वक्तव्याची चर्चा झाली होती.
वाचा मिशेल ओबामा यांची पोस्ट:
काय आहे नेमका निर्णय?
अमेरिकी राज्यघटनेनं गर्भपाताचा अधिकार दिला नसल्याचं स्पष्ट करून अमेरिकी न्यायालयाने १९७३मधील ‘रोए विरुद्ध वेड’चा निकाल रद्द केला. या निकालात स्त्रियांना गर्भपाताचा अधिकार देण्यात आला होता व देशातील राज्यांना याबाबत सर्वाधिकार देण्यात आलं होतं. यामुळं अमेरिकेत गर्भपाताची संख्या वाढल्याचा आरोप होत होता. अमेरिकेत विविध राज्यांत गर्भपाताचे वेगवेगळे नियम आहेत. न्यायालयाच्या या निकालामुळं अमेरिकेत गर्भपातासंबंधी पूर्ण चित्र बदलणार आहे. न्यायालय गर्भपातासंबंधी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यास तयार असल्याचं सूचित करणारा न्यायमूर्ती सॅम्युअल अॅलिटो यांचा अहवाल महिनाभरापूर्वी आश्चर्यकारकरीत्या फुटला होता. त्यानंतर महिन्याहून अधिक कालावधीनंतर न्यायालयानं हा निकाल दिला.