मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षामुळे संपूर्ण देशाचं लक्ष सध्या राज्याकडे लागलं आहे. यामुळे महाराष्ट्रातील (Maharashtra) राजकीय पेच आता एका निर्णायक वळणावर आला आहे. सोमवारी सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court) महाविकास आघाडीला धक्का मिळाला असताना बंडखोर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाकडू मात्र फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला. खरंतर सर्वोच्च न्यायालयाने बंडखोर आमदारांवर ११ जुलैपर्यंत कोणत्याही प्रकारच्या कारवाईस बंदी घातली आहे. असं असताना दुसरीकडे, आता आगामी काळात बंडखोर गट महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी पत्र पाठवण्याची शक्यताही वर्तवली जात आहे किंवा राज्यपाल स्वत: त्यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगू शकतात. त्यामुळे आता राजकारणात पुढे काय होतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे.

आतापर्यंत बंडखोर गटाला फ्लोअर टेस्टसाठी मुंबईत (Mumbai) यावं लागेल, असा दावा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) किंवा त्यांच्या नेत्यांकडून केला जात आहे. पण जर शिंदे गट मुंबईत आला तर मात्र यातील बंडखोर आमदार पुन्हा शिवसेनेत जाण्याची शक्यता आहे. पण ज्या वेगाने एकनाथ शिंदेंच्या गोटात बंडखोर आमदारांची संख्या वाढेतय त्यातून बंडखोर आमदार पुन्हा शिवसेनेत जाण्याची शक्यता कमीच आहे.

ना रस्ते-ना हॉस्पिटल, किराणा आणण्यासाठीही संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या मूळ गावाची काय आहे स्थिती?

राजकीय घडामोडींवर भाजपचा डोळा

या संपूर्ण राजकीय उलथापालथीमध्ये भाजपने स्वतःला वेगळे ठेवल्याचं पाहायला मिळतं. पण महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणावर त्यांची करडी नजर आहे. सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणणार नसल्याचं भाजप नेते सांगत आहेत. मात्र, एकनाथ शिंदे हेच राज्यपालांना पत्र लिहून सध्याचे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्याची दाट शक्यता आहे. शिंदेच सरकारविरोधात अविश्वास ठराव आणण्याच्या तयारीत दिसत आहे. जर असं झालं तर महाविकास आघाडी सरकारच्या अडचणी वाढू शकतात.

गुवाहाटीत बसून बहुमत सिद्ध करणार?

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ३९ आमदारांसह ५० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे लवकरच ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी सभागृहात आव्हान दिलं जाऊ शकतं, असंही बोललं जात आहे. असं झाल्यास ठाकरे यांच्या विरोधात असलेल्या एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदारांना गुवाहाटीत राहून बहुमत सिद्ध करण्याची संधी मिळेल का? असा प्रश्न सध्या चर्चेचा विषय आहे. नवभारत टाइम्स ऑनलाइनच्या टीमने या विषयावर घटनातज्ज्ञ आणि ज्येष्ठ वकील डॉ. सुरेश माने यांच्याशी चर्चा केली. ते काय म्हणाले जाणून घेऊयात…

Explainer: संजय राऊत यांचे शिवसेनेतील वर्चस्व कसं वाढलं; ‘या’ गोष्टी ठरल्या कारणीभूत?
एकनाथ शिंदे गटाच्या वतीने बहुमत सिद्ध करण्याचा दावा राज्यपालांसमोर मांडला तर त्यानंतर महाराष्ट्र विधानसभेत सर्व आमदारांनी उपस्थित राहणं बंधनकारक होईल. त्यांच्या उपस्थितीशिवाय बहुमत सिद्ध करता येत नाही. प्रत्येक आमदाराने सभागृहात उपस्थित राहणे बंधनकारक आहे. अशा स्थितीत गुवाहाटीत बसून महाराष्ट्रातील सरकारला कोणी आव्हान देऊ शकेल, हा प्रश्न आपोआपच संपतो. त्यामुळे शिंदे गटाला आव्हान देण्यासाठी मुंबईत येणं महत्त्वाचं आहे.

अविश्वास प्रस्तावासाठी काय नियम आहेत?

राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता भाजपच ठाकरे सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणू शकतं, अशीही चर्चा एकीकडे आहे. अन्यथा बंडखोर एकनाथ शिंदे गट यासंदर्भात राज्यपालांना पत्र लिहू शकतो. अशा स्थितीतही राज्यपाल विशेष अधिवेशन बोलावण्याची विनंती सभागृह उपसभापतींना करू शकता असं डॉ. माने यांनी सांगितले. अधिवेशन बोलावल्यानंतर अविश्वास ठरावासाठीही मतदान होईल. या मतदान प्रक्रियेतही सर्व आमदार उपस्थित असणं आवश्यक आहे. यावेळी १०६ आमदार आणि सात अपक्ष आमदारांचा पाठिंबा असलेल्या भाजपसाठीही अविश्वास ठराव मंजूर होणे कठीण होऊ शकते. असात विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपला १३४ आमदारांचा पाठिंबा मिळाल्याचे बोलले जात आहे. पण पुढे येणाऱ्या सर्व अडचणींसाठी भाजपने मोठा प्लॅन तयार केल्याची चर्चा आहे.

एकनाथ शिंदे तळ ठोकून असलेल्या गुवाहाटीमधील ‘रेडिसन ब्ल्यू’ हॉटेलचा मोठा निर्णय
भाजपचा प्लॅन तयार

एकीकडे मविआ सरकार गॅसवर असताना दुसरीकडे भाजपनेही पूर्ण तयारी केली आहे. यामुळे महाराष्ट्रात केव्हाही मोठा राजकीय बदल होऊ शकतो. या आठवड्याच्या अखेरीस महाराष्ट्रात नवीन सरकार येईल, असा दावाही केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर एकामागून एक बैठका सुरू आहेत. त्यामुळे भाजपच्या खेळीकडे आता सगळ्यांच्या नजरा आहेत.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, जर सर्व काही ठीक झालं तर आम्ही शनिवार किंवा रविवारपर्यंत राज्यात नवीन सरकार स्थापन होण्याची अपेक्षा करतो. त्यांच्या या विधानामुळे शिवसेनेतील हालचालीही तीव्र झाल्या आहेत. त्यामुळे आता राजकीय पटलावर पुढे काय होणार? हे येणार काळच सांगेल.

आम्ही पाठिंबा काढतोय, सरकारला बहुमत सिद्ध करायला सांगा; शिंदेगटाचं राज्यपालांना पत्र

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here