‘अंगावर काटा आणणारा ट्रेलर’ अशा आशयाच्या अनेक प्रतिक्रिया हृताच्या अनन्या सिनेमाच्या ट्रेलरवर येत आहेत. इन्स्टाग्रामवर २.५ मिलियन फॉलोअर्स असणाऱ्या या अभिनेत्रीच्या चाहत्यांनी तर हा ट्रेलर डोक्यावर उचलून धरला आहे. तिचे कौतुक करताना चाहते थकत नाहीत. तर मग तिचा नवरा प्रतिक शाह (Prateek Shah) तरी यात मागे कसा राहील. हृताच्या कौतुकासाठी प्रतिकने इन्स्टाग्राम स्टोरी आणि पोस्ट शेअर केली आहे.
हे वाचा-मुलींच्या जन्माचं तुम्ही फक्त स्वागतच नाही केलं तर…प्राजक्ता माळीची ती पोस्ट चर्चेत
काय म्हणाला प्रतिक?
प्रतिक देखील अनन्याच्या ट्रेलर लाँच सोहळ्याला उपस्थित होता. सर्वात आधी त्याने ‘This’आणि हार्ट इमोजी असं लिहून अनन्याचे पोस्टर शेअर केले आहे. त्यानंतर त्याने ट्रेलर लाँट सोहळ्यातील व्हिडिओ पोस्ट करत त्याचा बिग स्क्रीनचा अनुभव शेअर केलाय. प्रतिकने आणखी एक स्टोरी पोस्ट करत अनन्याच्या ट्रेलरची झलक शेअर केली आहे. त्यात त्याने असं म्हटलं आहे की, ‘लेडीज अँड जेंटलमन.. माझी बायको..’

प्रतिक याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट देखील शेअर केली आहे. ज्यामध्ये तो असं म्हणतोय की, अनन्या : ट्रेलर आऊट !! इच्छेच्या.. निश्चयाच्या.. धैर्याच्या.. शौर्याच्या.. कथा असतात आणि मग एक कथा येते जी सामान्य माणसाच्या ताकदीच्या पलीकडे असते. एका सामान्य मुलीची ही विलक्षण गोष्ट आहे. आत्ताच ट्रेलर पाहा: तुम्हीही उभं राहून या अपवादात्मक रितीने प्रतिभावान असणाऱ्या मुलीच्या मोठ्या पडद्यावरील पदार्पणाची दखल घ्याल’. प्रतिकच्या या पोस्टवर हृताचा रिप्लायही तितकाच रोमँटिक आहे. तिने असं म्हटलंय की, ‘बेबी नेहमी माझ्यासह असण्यासाठी धन्यवाद, I Love You’.
हे वाचा- ‘माणसाला जन्मत:च नसतात दोन हात…’, अंगावर काटा आणणारा हृता दुर्गुळेचा अंदाज
अपघातातमध्ये हात गमावूनही जिद्दीने उभं राहणाऱ्या तरुणीची कहाणी म्हणजे अनन्या हा सिनेमा. ‘शक्य आहे, तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे..’ असा संदेश देणारा अनन्या हा सिनेमा प्रदर्शनापूर्वीच कमाल करतो आहे. आता सोशल मीडियावर कमेंट्समध्ये झालेली गर्दी थिएटरमधील गर्दीमध्ये कशी रुपांतरित होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.