सांगली : संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणार्‍या म्हैसाळ आत्महत्या प्रकरणी सांगली पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. ९ जणांच्या कुटुंबाची ती आत्महत्या नसून तो हत्याकांड असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एकाच घरात ९ जणांना मारण्यासाठी कसा आखला प्लॅन, कसा केला आत्महत्येचा बनाव? या प्रकरणाचा घटनाक्रम वाचून तुमच्या पायाखालची जमीन हादरेल.

या प्रकरणात ९ जणांना विष घालून मारल्याचं पोलीस तपासामध्ये निष्पन्न झालं आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे तर गुप्तधनाच्या प्रकारातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी व्यक्त केला आहे. इतकंच नाहीतर तांत्रिकाने चहामधून विष दिल्याचाही खुलासा समोर येत आहे. मिरज तालुक्यातील म्हैसाळ या ठिकाणी २० जून रोजी एकच वेळी नऊ जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती.

डॉक्टर होण्यासाठी ‘NEET’ परिक्षा उत्तीर्ण झाली पण.., विद्यार्थिनीची आत्महत्या; कारण वाचून हादराल
गावातील नरवाड रोड, अंबिका नगर चौंडजे मळा आणि हॉटेल राजधानी कॉर्नर या दोन ठिकाणी एकाच कुटुंबातील नऊ जणांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. पशु वैद्यकीय डॉक्टर डॉ. माणिक यल्लप्पा व्हनमोरे आणि त्याचा शिक्षक भाऊ पोपट यल्लप्पा वनमोरे यांच्यासह दोघांच्या आई, पत्नी आणि मुलांचा समावेश आहे. डॉ माणिक यल्लप्पा व्हनमोरे पत्नी रेखा माणिकवनमोरे, आई आकताई यल्लप्पा व्हनमोरे, मुलगी प्रतिमा माणिक व्हनमोरे, मुलगा आदित्य माणिक व्हनमोरे, पुतण्या शुभम पोपट व्हनमोरे यांनी राजधानी हॉटेलजवळ तर दुसऱ्या घरात डॉ. माणिक यांचा भाऊ पोपट यल्लप्पा व्हनमोरे, संगीत पोपट व्हनमोरे, मुलगी अर्चना पोपट व्हनमोरे याच्या घरात मृतदेह आढळून आले होते.

अरुण मोरे कुटुंबीयांच्याकडून एक चिठ्ठी मिळाली होती. ज्यामध्ये काही लोकांची नाव घालून हे आयुष्य घेऊन आत्महत्या केल्याचं नमूद करण्यात आलं होतं. त्यामुळे ही सामुहिक आत्महत्या सावकारी जाचातून केल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं होतं. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी २५ जणांच्या विरोधात सावकारकीचे गुन्हे दाखल करत १८ जणांना अटक केली. मात्र, वनमोरे आत्महत्या प्रकरणी अनेक प्रश्न घटनास्थळी निर्माण झाले होते. नक्की आत्महत्याच आहे की घातपात? त्याबद्दलही प्रश्न निर्माण झालं होतं. पण पोलिसांच्या तपासामध्ये ती आत्महत्या नसून ९ जणांचा खून झाल्याचं निष्पन्न झाले आहे.

ना रस्ते-ना हॉस्पिटल, किराणा आणण्यासाठीही संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या मूळ गावाची काय आहे स्थिती?

विषारी औषध देऊन नऊ जणांची हत्या करण्यात आल्याची माहिती सांगलीचे पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली आहे आणि या खून प्रकरणी दोघांना अटक करण्यात आल्याचेही दीक्षित गेडाम यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आहे. त्याच बरोबर गुप्तधनाच्या प्रकारातून मांत्रिकांच्याद्वारे हा खून करण्यात आल्याचं अंदाज पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी व्यक्त केला आहे. तर याप्रकरणी मांत्रिक धीरज चंद्रकांत सुरवशे (वय ३९ रा. वसंतविहार ध्यानेश्वरी प्लॉट आणि अब्बास मोहम्मद अली बागवान (वय वर्षे ४८ रा. सर्वदेनगर सोलापूर) या दोघांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, मोरे कुटुंबियांचं हत्याकांड कशा प्रकारे करण्यात आलं तो नेमका कोणत्या कारणातून करण्यात आला, याबाबतचा तपास सुरू असून वनमोरे कुटुंबावर सावकारी कर्ज देखील किती होतं? हा सगळा तपास सुरू असल्याचेही दीक्षित गेडाम यांनी सांगितलं आहे.

एकनाथ शिंदे तळ ठोकून असलेल्या गुवाहाटीमधील ‘रेडिसन ब्ल्यू’ हॉटेलचा मोठा निर्णय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here