यवतमाळ : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राजकारण ढवळून निघालं आहे. यामुळे महाविकास आघाडी सरकारवर अस्थिर झाले असून अंतर्गत खदखद आता समोर येत आहे. असाच एक प्रकार आमदार संजय राठोड यांच्याबाबतीत समोर आला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनेक आमदारांनी बंड केलं. यात माजी वनमंत्री संजय राठोड यांचाही समावेश आहे. पण त्यांच्या बंडामुळे एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका शिवसैनिकाकडून पूजा चव्हाण खळबळजनक वक्यव्य केलं आहे.

संजय राठोड यांच्या बंडामुळे आता शिवसैनिकांनीच त्यांच्याविरोधात पूजा चव्हाण प्रकरणातील पुरावे सादर करण्याची धमकी दिली आहे. सेना जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी मोठा गौप्यस्फोट केल्याने खळबळ उडाली आहे. खरंतर, पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणामध्ये संजय राठोड यांना मंत्रिपद सोडावं लागलं होतं. पण ते आता लवकरच मंत्रिमंडळात घरवापसी करणार असल्याची चर्चा होती. पण, ते आता गुवाहाटीत पोहोचल्याने शिवसैनिकांनी त्यांच्याविरोधात थेट खूनाचा आरोप केला आहे.

Sangli Suicide Case: चहाचा घोट घेताच पडले ९ जणांचे मृतदेह, म्हैसाळ हत्याकांडात खळबळजनक खुलासा
शिवसेनेशी संजय राठोड यांनी गद्दारी केल्यामुळे त्यांचे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातले सर्व पुरावे समोर आणू. या प्रकरणात ५६ मिनिटांची एक सीडी आपल्याकडे आहे. बंजारा समाजाची मुलगी त्याने कशी मारली हे त्यातून उघड होईल, असा गौप्यस्फोट राजेंद्र गायकवाड यांनी केला आहे. इतकंच नाहीतर राठोड विरुद्ध बोलणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ आता त्यांच्या मांडीला मांडी लाऊन कशा बसणार असा सवालही गायकवाड यांनी केला.

संजय राठोड यांनी बंजारा समाजाशी बेईमानी केली. पूजा चव्हाण वर कसे अत्याचार केले हे आम्हाला माहिती आहे. त्यांच्या या बेईमानीमुळे त्याचा पर्दाफाश करू असेही गायकवाड यांनी जाहीर भाषणात सांगितलं. त्यांच्या या भाषणामुळे पूजा चव्हाण प्रकरणात नेमकं काय घडलं? असा सवाल आता पुन्हा एकदा समोर येत आहे.

डॉक्टर होण्यासाठी ‘NEET’ परिक्षा उत्तीर्ण झाली पण.., विद्यार्थिनीची आत्महत्या; कारण वाचून हादराल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here