मुंबई: सेलिब्रिटी कलाकारांबाबत घडणाऱ्या घडामोडी या नेहमीच चर्चेचा आणि बातमीचा मुद्दा असतो. त्यात जर कलाकारांना जेव्हा पोलिसांकडून अटक होते तेव्हा त्यांच्यावर काय आरोप आहेत आणि ते प्रकरण नेमकं काय आहे हे प्रेक्षकांना जाणून घ्यायचं असतं. असच काही घडलं आहे मल्याळम अभिनेता आणि निर्माता विजय बाबू याच्या आयुष्यात. विजय बाबूला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर एका महिलेचं लैंगिक शोषण (Sexual Harassment Case against Vijay Babu) केल्याचा आरोप आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरूनच विजय बाबूला पोलिसांनी अटक (Vijay Babu Arrested) केली आहे.

हे वाचा-‘बॉलिवूड ड्रग्जची नशा करणाऱ्या लोकांनी भरलेले नाही…’, सुनील शेट्टीकडून पाठराखण

विजय हा एक प्रसिध्द अभिनेता आणि निर्माता आहे. सोशल मीडियावर त्याची तगडी फॅन फॉलोइंग आहे. विजय नेहमी फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांशी संवाद साधत असतो. पण गेल्या काही दिवसांपासून विजय चर्चेत आला आहे तो त्याच्यावरील लैंगिक शोषणाच्या आरोपामुळे. दोन महिन्यांपूर्वी एका महिलेने विजयवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी तिने पोलिसांत तक्रारही दाखल केली. मीडिया रिपोर्टनुसार, एर्नाकुलम पोलीस ठाण्यात सोमवारी २७ जून रोजी विजयला चौकशीसाठी बोलवण्यात आले तेव्हाच त्याला अटक करण्यात आली. ३ जुलैपर्यंत त्याला चौकशीसाठी ताब्यात ठेवण्यात येणार आहे.

Vijay Babu

विजयच्या चाहत्यांना या प्रकरणामुळे धक्का बसला आहे. त्यामुळे हे प्रकरण नेमकं काय आहे हे जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते सोशल मीडियावर या प्रकरणाची माहिती घेत आहेत. विजयवर संबंधित महिलेने लैंगिक शोषण आणि बलात्काराचाही आरोप केल्याने या प्रकरणाला गंभीर वळण लागलं आहे. तक्रार दाखल केल्यानंतर विजयने जामिनासाठी अर्ज केला होता जो मंजूरही झाला होता, पण त्यानंतरही विजयला अटक करण्यात आली आहे.

हे वाचा-अमेरिकेतील गर्भपात कायद्याला प्रियांकाचा विरोध, काय आहे हा नेमका निर्णय?

पीडित महिलेने तक्रार दाखल केल्याचं कळताच विजय फरार झाल्याचीही बातमी होती. यावेळी तो दुबईत असल्याची माहित पुढे आली. भारतात परतल्यानंतर विजयने सोशल मीडियावरून तो निर्दोष असल्याचा व्हिडिओ शेअर केला होता, तसेच ज्या महिलेने तक्रार दिली तिच्यावर मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचं त्याने स्पष्ट केलं होतं. एकीकडे विजय लैंगिक शोषणप्रकरणी अडकल्यामुळे त्याच्या समोरील अडचणींमध्ये वाढ झाली होती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here