भाजपमुळं एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री होता आला नाही, असं संजय राऊत म्हणाले. मुंबईत येऊन थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी बोला, असं आवाहन संजय राऊत यांना केलं.

 

Sanjay Raut Alibag
संजय राऊत

हायलाइट्स:

  • शिवसेनेचा अलिबागमध्ये मेळावा
  • संजय राऊतांची बंडखोरांवर टीका
  • मुंबईत येऊन चर्चा करण्याचं आवाहन
रायगड : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अलिबाग येथे शिवसैनिकांना संबोधित केलं. राज्यातील सत्तासंघर्षांच्या पार्श्वभूमीवर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना मेळाव्यांमध्ये मार्गदर्शन करणं सुरु ठेवलं आहे. आज अलिबागमध्ये संजय राऊत यांनी कुणीतरी माझा उल्लेख अलिबागचा पुत्र असा केलाय, असं म्हटलं. दि.बा. पाटील हे मोठे नेते होते, बाळासाहेब ठाकरे यांचे सहकारी होते. आपल्याला या सभेनंतर कार्यक्रम करायचा आहे. करेक्ट कार्यक्रम म्हणतात ना आपल्याला तसं करायचंय. शिवसैनिक जागेवर आहेत, आमदार वॉकरवर गुवाहाटीला चालतात, असा टोला संजय राऊत यांनी महेंद्र दळवींना लगावला. मी महेंद्र दळवींना फोन केला तर त्यांनी आराम करतोय सांगितलं, असा राऊत म्हणाले.

अलिबागला हॉटेल, डोंगर, झाडी नाही का, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.आमदार रॅडिसन ब्लूच्या जेलमध्ये बसले आहेत, बाहेर पडायची हिम्मत नाही. अलिबागमध्ये सध्या शिवसैनिक आहेत, शिवसेनेचे आमदार नाहीत ते पुढील वेळी असतील, असं संजय राऊत म्हणाले. ठाण्याच्या भाईंना इकडचे दादा भारी पडतील,असं संजय राऊत म्हणाले. मुंबईहून मोठ्या प्रमाणावर मीडिया आला आहे, त्यांना ईडीवाले मला अटक करतील, असं वाटतंय. मला अटक करा पण गुवाहाटीला जाणार नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं.
Video : काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल… एकनाथ शिंदेंची फर्माईश, बापूंनी पुन्हा डायलॉग ऐकवला!
महेंद्र दळवींचं हिंदुत्व धोक्यात कसं आलं? ते काँग्रेसमध्ये होते, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, शेकापमध्ये होते ते नंतर आपल्याकडे आले, असं संजय राऊत म्हणाले. आता बैल बदलायची वेळ आलीय, असं राऊत म्हणाले. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केल्यानंतर २६० सेना स्थापन झाल्या. मात्र, आतापर्यंत केवळ दोनचं सेना राहिल्या आहेत. एक भारतीय सेना आणि दुसरी ही शिवसेना आहे, असं संजय राऊत म्हणाले. अब्दुल सत्तार यांचं हिंदुत्व कसं धोक्यात आलं, असा सवाल संजय राऊत यांनी केला. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांपैकी २२ आमदार राष्ट्रवादीतून इकडं आलेले आहेत आणि आता तुम्ही शरद पवार यांच्या टीका करता, असा सवाल संजय राऊत यांनी केला.
मोहम्मद झुबैर यांना अटकेतून मुक्त करा, एडिटर्स गिल्डकडून दिल्ली पोलिसांच्या कारवाईचा निषेध
गेल्या २२ वर्षांमध्ये तुम्हाला आनंद दिघे आठवले नाहीत. आता मुख्यमंत्री व्हायचंय म्हणून तुम्हाला आनंद दिघे आठवले का? असा सवाल संजय राऊत यांनी केला. तीन पक्षाचं सरकार चालवायचं असेल तर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावं, असा हट्ट आम्ही धरला. शरद पवार साहेब आणि सोनिया गांधी या देशातील ज्येष्ठ नेत्यांनी सरकार चालवायला संयमी माणूस आवश्यक असल्याचं सांगितलं, असं संजय राऊत म्हणाले.
फडणवीस सीएम झाल्यास शिंदे उपमुख्यमंत्री; आणखी कोणाकोणाला मंत्रिपदं? पाहा संभाव्य यादी

‘सरकार टिकेल किंवा जाईल, पण…’, राणेंच्या टीकेला संजय राऊतांचं प्रत्युत्तर

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : shivsena leader sanjay raut rally at alibag slam rebel mlas appeal to come back at mumbai
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here