छिंदवाडा: छिंदवाडा महापालिका निवडणुकीत आता उमेदवारांना त्यांच्या मतदारांना दारू पाजता येणार आहे. त्यासाठी होणारा खर्च उमेदवारांना निवडणूक खर्चात जाहीर करावा लागेल. यासाठी जिल्हा प्रशासनानं उमेदवारांना एक यादी दिली आहे. या यादीमध्ये देशी, विदेशी दारूच्या २५० ब्रँड्सचा समावेश आहे.

महापालिकेची निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना खर्चाचा तपशील निवडणूक आयोगाला दाखवावा लागतो. कोणत्या वस्तूंवर किती खर्च केला त्याची आकडेवारी आयोगाकडे जमा करणं बंधनकारक असतं. त्यासाठीची मार्गदर्शिका जिल्हा प्रशासनानं प्रसिद्ध केली आहे. प्रशासनाकडून एक यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये २५० ब्रँड्सची नावं आहेत. देशी-विदेशी मद्याचे प्रकार आणि त्यांचे दर यामध्ये देण्यात आले आहेत.
एक दिवस हा चाकू मोदींच्या गळ्यापर्यंत पोहोचावा! दुकानदाराची हत्या करणाऱ्या आरोपींची धमकी
या प्रकरणी काँग्रेसनं निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदवली आहे. छिंदवाड्याचे सहाय्यक अबकारी आयुक्त माधुसिंह भयढिया यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी काँग्रेसनं केली आहे. अशा प्रकारे दारूची यादी आणि दर उपलब्ध करून देण्याचा अर्थ उमेदवार मतदारांना दारू वाटू शकतो आणि त्याच्या खर्चाचा तपशील देऊ शकतो. यामुळे आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन होत असून दारू विक्रीत वाढ होईल, असं काँग्रेसनं म्हटलं आहे.

मध्य प्रदेश काँग्रेसचे निवडणूक प्रभारी जे. पी. धनोपिया यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिलं आहे. हा आदेश तत्काळ रद्द करण्यात यावा आणि अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी धनोपिया यांनी केली आहे. अशा प्रकारचा आदेश नैतिकता आणि घटनेला धरून नाही, असं धनोपिया यांनी म्हटलं आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here