मुंबई : मंत्रिमंडळाच्या बैठकीत खरीप हंगामाबाबतही गांभीर्याने आढावा घेण्यात आला. राज्यातील पेरण्याची स्थिती समाधानकारक नसल्याची माहिती देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. त्यांनी खरीप हंगामाचा आढावा घेतला.

गेल्यावर्षी राज्यात आजच्या घडीला सरासरी २७० मिलीमीटर पाऊस झाला होता. त्या तुलनेत यंदा मात्र केवळ १३४ मिमी. पाऊस झाला आहे. गतवर्षी आजच्या दिवशी पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. यंदा मात्र खरीपाखालील क्षेत्रापैकी केवळ १३ टक्के (२०.३० लाख हेक्टर) क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत.

कुर्ला इमारत दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना ५ लाख रुपयांची मदत
शहरातील पाणीपुरवठ्याचा आढावा घेणार

कमी पावसामुळे शहरांमध्ये देखील पाणीपुरवठा कमी होऊ शकतो. त्यामुळे उद्या (२९ जून) नगर विकास खात्याचा कार्यभार असलेले मंत्री सुभाष देसाई हे सर्व पालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधून पाणी पुरवठ्याचे नियोजन कसे केले जाणार आहे याबाबत आढावा घेणार आहेत.

आमचा बाप काढता आणि समेटाची हाकही देता, याचा अर्थ काय?, एकनाथ शिंदेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल
राज्यात ४९६ टँकर्सने पाणीपुरवठा

राज्यात २७ जूनअखेर ६१० गावे आणि 1266 वाड्यांना ४९६ टॅंकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये शासकीय टँकर्सची संख्या ६६ तर खाजगी टँकर्सची संख्या ४३० इतकी आहे. पावसाला सुरुवात झाल्यामुळे मागील आठवड्याच्या तुलनेत टँकर्सची संख्येत ३१ ने तर टचाईग्रस्त गावांच्या संख्येत २४ ने आणि वाड्यावस्त्यांच्या संख्येत १३० ने घट झालेली आहे.

कोण बाजी मारणार?; ‘या’ तीन बंडखोर आमदारांची मंत्रिपदासाठी स्पर्धा?
राज्यातील पाणीसाठा

राज्यातील धरणातील एकूण पाणीसाठा २८ जूनअखेर २१.८२ टक्के इतका आहे. विभागवार पाणीसाठ्यामध्ये अमरावती विभागातील प्रकल्पात ३३.८० टक्के, मराठवाडा विभागात २७.१० टक्के, कोकण विभागात ३४.४३ टक्के, नागपूर विभागात २६.८१ टक्के, नाशिक विभागात २०.२२ टक्के, पुणे विभागात १२. ३५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here