पाटणा: शिवसेनेचे वरिष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार संकटात सापडलं आहे. शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे दोन तृतीयांश आमदार असल्यामुळे पक्ष आणि सरकार वाचवण्याचं दुहेरी आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसमोर आहे. या सत्तासंघर्षावर जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी भाष्य केलं आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीत त्यांच्याच लोकांनी खंजीर खुपसला. माझ्यासोबतही असाच प्रकार घडला होता, असं पासवान म्हणाले.

महाराष्ट्रात सुरू असलेल्या सत्तासंघर्षाबद्दल चिराग पासवान यांना विचारण्यात आलं. महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय संकटाबद्दल कोणालाही दोष देता कामा नये. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीत त्यांच्याच लोकांनी सुरा खुपसला. गेल्या वर्षी माझ्यासोबतही असाच प्रकार घडला होता. त्यावेळी माझ्याच पक्षातील नेत्यांनी माझा विश्वासघात केला आणि एक वेगळा पक्ष स्थापन केला, असं पासवान म्हणाले.
ठाकरे सरकारचं राजकीय संकटाच्या काळात काम सुरु, पोलीस भरती लवकरच, गृहमंत्र्यांची मोठी घोषणा
चिराग यांचा इशारा त्यांचे काका आणि केंद्रीय मंत्री पशुपती कुमार पारस यांच्यावर होता. पारस यांनी गेल्या वर्षी चिराग यांना हटवून लोक जनशक्ती पक्षाचे प्रमुख झाले. पारस यांनी त्यांचे दिवंगत बंधू यांच्या सावलीत राजकीय कारकिर्द सुरू केली. लोजपमध्ये वेगळा गट तयार झाल्यानंतर ते राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आहेत.

जेव्हा चिराग स्वत:ला मोदींचे हनुमान म्हणायचे
२०२० मध्ये बिहारमध्ये विधानसभा निवडणूक झाली. त्या निवडणुकीत लोक जनशक्ती पक्षानं भाजपचा मित्रपक्ष असलेल्या संयुक्त जनता दलाविरोधात उमेदवार दिले. एनडीएचा घटक पक्ष असूनही लोजपनं जेडीयूच्या विरोधात उमेदवार उभे केले. त्याचा फटका जेडीयूला बसला. जेडीयूचे २७ उमेदवार पराभूत झाले. त्यामुळे २०१५ मध्ये ७१ जागा जिंकणाऱ्या जेडीयूच्या जागा ४३ वर आला. या निवडणुकीवेळी प्रचारात चिराग यांनी स्वत:ला पंतप्रधान मोदींचा हनुमान म्हणत होते.
राष्ट्रवादीच्या पडलेल्या आमदारासह तटकरेंनाही निधी, योगेश कदमांचा परबांवर निशाणा
जेडीयूच्या जागा पाडण्यासाठी पासवान यांनी अनेक मतदारसंघात उमेदवार दिले. आपण किंगमेकर होऊ असा विश्वास पासवान व्यक्त करत होते. मात्र प्रत्यक्षात पासवान यांच्या पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. ८ जागांवर त्यांचा पक्ष दुसऱ्या क्रमांकावर राहिला. मात्र पासवान यांनी २७ जागांवर जेडीयूचे उमेदवार पाडले. त्यामुळे बिहारमध्ये भाजप मोठा भाऊ झाला. तर जेडीयू लहान भाऊ ठरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here