पुणे : सध्या सूरू असलेल्या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यामुळे झाडं कोसळण्याच्या घटना घडत असतात. यातच, आता पुण्यातील एसपी रोड जवळील एक भलं मोठं लिंबाचं झाड अचानक पडल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली. या दुर्घटनेत २ ते ३ जण जखमी झाल्याचे प्राथमिक माहिती मिळाली आहे. यात २ दुचाकी, टेम्पो आणि रिक्षाचे मोठे नुकसान झालं आहे. पुण्यातील बालभारती चौकात काही वेळापूर्वी एक भलं मोठं झाड कोसळल्याची घटना घडली आहे, पुण्यातील सेनापती बापट रोड आणि लॉ कॉलेज रोडला जोडणारा हा मुख्य चौक असून या रस्त्यावर कायम रहदारी असते. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही.