मुंबई : आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूरनं (Ranbir Kapoor) ते लवकरच आई-बाबा होणार असल्याची गुड न्यूज सोशल मीडियावर शेअर केली. आलियानं तिच्या इन्स्टाग्रामवर ही पोस्ट शेअर केल्यानंतर तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आलियानं तिच्या इन्स्टा स्टोरीवर पोस्ट शेअर करत शुभेच्छांचा वर्षाव करणाऱ्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. त्याचप्रमाणं तिच्या प्रेग्नंसीचा आणि तिच्या प्रोजेक्टबद्दल खोट्या बातम्या देणाऱ्यांचा कठोर शब्दांत तिनं समाचारही घेतला आहे.

आलियानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ती प्रेग्नंट असल्याची पोस्ट शेअर केली. त्यानंतर तिच्यावर चाहत्यांनी आणि बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला. आलियावर शुभेच्छांचा वर्षाव होत असताना काहींनी मात्र तिच्या आगामी सिनेमाबद्दल आणि तिच्या प्रोजेक्टबद्दल काही चुकीची माहिती दिल्यानं आलिया नाराज झाली. तिनं ही नाराजी तिच्या इन्स्टा स्टोरीवरून व्यक्त करत चुकीची माहिती पसरवणाऱ्यांचा कठोर शब्दांत समाचार घेतला आहे.


काय म्हणाली आलिया
प्रेग्नंसीची बातमी शेअर केल्यानंतर तिच्या कामासंदर्भातील काही चुकीची माहिती समोर आल्याचं मत आलियानं पोस्टमध्ये व्यक्त केलं आहे. आलिया आता आराम करणार आहे, तिला रणबीर कपूर युकेमधून आणायला जाणार आहे. आलियां तिची प्रेग्नंसी अगदी योग्य वेळेत प्लॅन केली जेणेकरून तिच्या सिनेमांच्या चित्रीककरणावर परिणाम होऊ नये, अशा आशयाच्या बातम्या एका न्यूजपोर्टलनं शेअर केल्या होत्या. त्याबद्दल आलियानं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. (Alia Bhatt disappointed rumors regarding pregnancy) या संदर्भात तिनं इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत खडे बोल सुनावले आहेत. आलियानं लिहिलं आहे की, ‘आपण आजही पितृसत्ताक पद्धती असलेल्या समाजात राहतो.. तुमच्या माहितीसाठी… काहीच बदल झालेला नाहीये.., कशालाच उशीर झालेला नाहीये. कुणीही मला इथं न्यायला येणार नाहीये. कोणीच मला घ्यायला येण्याची गरज नाहीये. मी एक स्त्री आहे पार्सल नाही. मला आरामाची गरज नाहीये, पण ऐकून बरं वाटलं की तुमच्यापैकी काही जणांना डॉक्टरच्या सल्ल्याची गरज आहे. हे २०२२ वर्ष आहे. आपण या जुन्या विचारांतून बाहेर येऊ शकतो का? एक्सक्युज मी माझा शॉट रेडी आहे…’ आजच्या जगात सुद्धा एका स्वतंत्र स्त्री ला अशा वाह्यात गोष्टींना सामोरं जावं लागत याचा राग तिनं या स्टोरीमधून व्यक्त केला आहे.

स्टोरी

चाहत्यांचे मानले आभार
दरम्यान, आलियानं तिच्या चाहत्यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल त्यांचे खास आभार मानणारी स्टोरी देखील शेअर केलीआहे. त्यात तिनं लिहिलं आहे की, ‘ तुमच्या प्रेमानं आम्ही भारावून गेलो आहोत. प्रत्येकाचा मेसेज वाचण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. तुमचं प्रेम आणि आशिर्वाद असेच कायम राहू देत. आमच्या आयुष्यातील ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्हा सर्वांबरोबर शेअर करताना खूप आनंद होत आहे. सर्वांचे आभार…”.

दरम्यान, आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांचं १४ एप्रिल २०२२ रोजी दणक्यात लग्न झालं. त्यांच्या लग्न सोहळ्याला कुटुंबातील जवळचे आणि निवडक मित्रमंडळी उपस्थित होते.

आलिया भट्टनं इन्स्टास्टोरीवर शेअर केल्यात दोन खास पोस्ट

पोस्टमधून आलियानं चाहत्यांचे मानले आभार

तर खोट्या बातम्या देणाऱ्यांचे उपटले कान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here