मुंबई :एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर गेली ९ दिवस शांत असलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची अखेर सत्तानाट्याच्या अंकात झोकात एन्ट्री झालेली आहे. आज रात्री साडे नऊच्या आसपास त्यांनी राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. शिवसेनेच्या ३९ आमदारांनी महाविकास आघाडीबरोबर राहायचं नाही, अशी भूमिका घेतल्याने राज्यात राजकीय अस्थिरता आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर सरकारला बहुमत सिद्ध करायला सांगावं, अशी विनंती त्यांनी राज्यपालांकडे विशेष पत्राद्वारे केली. तत्पूर्वी आज दुपारी त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. याच भेटीनंतर सगळी सूत्रे हलली. त्यानंतर त्यांनी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास मुंबईत पाऊल ठेवलं आणि भाजपच्या शिष्टमंडळासह राजभवन गाठलं. राज्यपालांशी सुमारे ४० मिनिटांच्या चर्चेनंतर ते राजभवनाबाहेर आले आणि भेटीचा तपशील माध्यमांना सांगितला.

आप क्रोनोलॉजी समझिये, ‘वेट अँड वॉच’ भाजप २४ तासात राजभवनात कसं पोहोचलं?
दुपारी अमित शहा, जेपी नड्डांशी खलबतं

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर भाजपने थेटपणे यावर बोलणं टाळलं होतं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना तर जणू याप्रकरणाची सुतराम कल्पना नव्हती. कारण गेल्या ९ दिवसांपासून त्यांनी माध्यमांना कोणतीच कमेंट दिली नव्हती. यादरम्यान त्यांच्या दिल्लीवाऱ्या सुरु होत्या. या आठवड्यातील त्यांची आजची पाचवी दिल्लीवारी होती. आज दुपारी त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीवेळी त्यांच्यासोबत अॅड. महेश जेठमलानी देखील होते. जेठमलानी यांच्यासोबत फडणवीसांनी कायदेशीर बाबींवर चर्चा केली.

जे होईल त्याला सामोर जाणार, फडणवीस राज्यपाल भेटीवर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया
दिल्लीतील भेटीसाठी आटपून रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ते शासकीय निवासस्थानी ‘सागर’ बंगल्यावर आले. त्यानंतर चंद्रकांतदादा पाटील, सुधीर मुनगंटीवार, प्रवीण दरेकर, गिरीश महाजन आणि आशिष शेलार यांच्यासह त्यांनी राजभवन गाठलं. तिथे भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपालांशी जवळपास ४० मिनिटे चर्चा केली. शिवसेनेच्या ३९ आमदारांनी महाविकास आघाडीबरोबर राहायचं नाही, अशी भूमिका घेतल्याने राज्यात राजकीय अस्थिरता आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर सरकारला बहुमत सिद्ध करायला सांगावं, अशी विनंती त्यांनी राज्यपालांकडे विशेष पत्राद्वारे केली.

शिंदे गटाची महत्त्वाची बैठक सुरू; फडणवीस-कोश्यारींच्या भेटीनंतर हायव्होल्टेज घडामोडी
राज्यपालांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले…

“माननीय राज्यपालांना आज ईमेल द्वारे आणि प्रत्यक्ष पद्धतीने भाजपने पत्र दिलेलं आहे. या पत्रात राज्याची आताची परिस्थिती आहे, त्याचा उल्लेख केलेला आहे. शिवसेनेच्या ३९ आमदारांनी आघाडीसोबत राहायचं नाही, असा पवित्रा घेतलेला आहे. याचा साधा अर्थ आहे, ते ३९ आमदार ठाकरे सरकारसोबत नाहीये. त्यामुळे सरकारजवळ बहुमत राहिलेलं नाहीये. त्यामुळेच सरकारला बहुमत सिद्ध करायला लावावं, यासाठीचं पत्र आम्ही राज्यपालांना दिलेलं आहे. या पत्रावर राज्यपाल योग्य निर्णय घेतील. बहुमत सिद्ध करण्यासाठी उचित निर्देश देतील, अशी आम्हाला आशा आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here