डब्लिन : आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारताच्या दोन धावा कमी करण्यात आल्या. पण चाहत्यांना सुरुवातीला या गोष्टीचे कारण समजले नाही. पण थोड्या वेळातच भारताच्या दोन धावा कमी का करण्यात आल्या ते सांगण्यात आले. कारण सुरुवातीला भारताने २२७ धावा केल्या आणि आय़र्लंडपुढे विजयासाठी २२८ धावांचे आव्हान ठेवले, असे सांगण्यात आले होते. पण त्यानंतर मात्र भारताने २२५ धावा केल्या आणि आयर्लंडपुढे २२६ धावा ठेवल्याचे सांगण्यात आले होते.

नेमकी कोणाकडून घडली चूक, जाणून घ्या…भारताने या सामन्यात धडाकेबाज फटकेबाजी करत दोनशे धावांचा पल्ला गाठला. भारताने जेव्हा २० षटके संपवली तेव्हा त्यांच्या धावफलकावर ७ बाद २२७ असे दाखवण्यात येत होते. त्यामुळे आयर्लंडला विजयासाठी आता २२८ धावा हव्यात, हे सर्व सामन्य चाहत्यांना लगेच समजले. पण त्यानंतर जेव्हा आयर्लंडचा संघ फलंदाजीला आला तेव्हा मात्र त्यांच्यासमोर २२६ धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते. त्यामुळे नेमका घोळ कुठे झाला, हे कोणालाच कळत नव्हते. पण कालांतराने याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले. या सामन्याच्या २०व्या षटकामध्ये ही चूक घडल्याचे समोर आले. त्यावेळी भारताचा कर्णधार हार्दिक पंड्या हा फलंदाजी करत होता. २०व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर २ धावा काढण्यात आल्या अशी नोंद करण्यात आली आणि त्यानंतर भारताने आयर्लंडपुढे २२८ धावांचे आव्हान ठेवले, असे सांगण्यात आले. पण त्यानंतर मात्र ही चूक उमगली. कारण २०व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर हार्दिक पंड्याने एकही धाव काढली नव्हती, पण धावसंख्येमध्ये तर या दोन धावा जमा करण्यात आल्या होत्या. त्यामुळे ही चूक त्यानंतर सुधारण्यात आली. त्यामुळे भारताच्या धावसंख्येतून दोन धावा वजा करण्यात आल्या आणि आयर्लंडपुढे २२६ धावांचे सुधारीत आव्हान ठेवण्यात आले. आयर्लंडने या आव्हानाचा अखेरच्या षटकापर्यंत चांगला पाठलाग केला. अखेरच्या चेंडूवर आयर्लंडला जिंकण्यासाठी सहा धावांची गरज होती. पण त्यावेळी फक्त एकच धावा आयर्लंडला काढता आली आणि त्यांचा भारताने चार धावांनी पराभव केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here