मुंबई: तब्बल ४० आमदारांना फोडून शिवसेनेला हादरा देणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या अडचणी आता वाढवण्याची शक्यता आहे. कारण, पुण्यातील प्रथमवर्ग न्यायालयात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांनी २०१४ आणि २०१९ साली निवडणुकीचा अर्ज भरताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात वाहने, मालमत्ता आणि शैक्षणिक माहितीमध्ये तफावत असल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांनी २०१९ मधील निवडणुकीत आपल्याकडील वाहनांची किंमत घटवून सांगितली. तसेच शेतजमीन असल्याची बाबही लपवून ठेवली, असे आरोप याचिकेतून करण्यात आले आहेत. अभिजित खेडेकर, डॉ. अभिषेक हरदास आणि समीर शेख यांनी ही याचिका दाखल केली आहे. या प्रकरणामुळे भविष्यात एकनाथ शिंदे यांच्या अडचणी वाढू शकतात.

एकनाथ शिंदे यांनी २०१४ च्या शपथपत्रामध्ये आरमाडा गाडी ८ लाख रुपयांना खरेदी केल्याचे नमूद केले आहे. मात्र, २०१९ च्या निवडणूक पत्रामध्ये हीच आरमाडा ९६ हजार ७२० रुपयांना खरेदी केल्याचे नमूद केले आहे. २०१४च्या निवडणूक शपथपत्रात शिंदे यांनी स्कॉर्पिओ ११ लाख रुपयांना खरेदी केल्याचे म्हटले आहे. मात्र, २०१९च्या शपथपत्रामध्ये तीच गाडी अवघ्या लाख ३३ हजार रुपयांना खरेदी केल्याचे नमूद केले आहे. २०१४ च्या शपथपत्रात बोलेरो ६ लाख ९६ हजार ३७० रुपयांना, तर तीच गाडी २०१९ च्या शपथपत्रात लाख ८९ हजार ७५० रुपयांना खरेदी केल्याचे म्हटले आहे.
सत्ताबदलाच्या हालचालींना वेग! बहुमत चाचणीची भाजपची मागणी, बंडखोर आमदार मुंबईत येणार?
२०१४ च्या शपथपत्रक्षात एक टेम्पो ९२ हजार २२४ रुपयांना खरेदी केल्याचे, तर २०१९ च्या शपथपत्रात तोच टेम्पो त्यांच्या पत्नीने २१ हजार ३६० रुपयांना खरेदी केल्याचे नमूद केले आहे. २०१४ च्या शपथपत्रात इनोव्हा १७ लाख ७० हजार १५० रुपयांना खरेदी केल्याचे, तर २०१९ च्या पत्रामध्ये तीच गाडी त्यांच्या पत्नीने ६ लाख ४२ हजार २३० रुपयांना खरेदी केल्याचे नमूद केले आहे.
महाराष्ट्रातील सत्तातिढ्याचे चक्रव्यूह भेदण्यासाठी महाविकास आघाडीकडे तीन पर्याय; पण…

शेतजमीन आणि इमारतीची माहिती लपवली

एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पत्नीच्या नावे असणारी शेतजमीन आणि इमारतीची माहितीही लपवल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. २००९ आणि २०१४ च्या शपथपत्रांमध्ये शिंदे यांनी पत्नीकडे शेतजमीन नसल्याचे नमूद केले होते. मात्र, २०१९ च्या शपथपत्रामध्ये त्यांच्या पत्नीने ठाणे जिह्यातील चिखलगाव येथे सर्वे नंबर ८४४,८४५ ही जमीन ६ ऑगस्ट २००९ मध्येच खरेदी केल्याचे नमूद केले आहे. तसेच शिंदे यांनी २०१४ च्या शपथपत्रामध्ये त्यांच्या पलीकडे वाणिज्य इमारत नसल्याचे नमूद केले आहे. मात्र, २०१९ च्या शपथपत्रामध्ये त्यांच्या पलीकडे ठाणे येथील वागळे इस्टेट येथे ००७ प्लॉट नंबर बी ५१ येथे वाणिज्य इमारत २० नोव्हेंबर २००२ रोजीच खरेदी केल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे शिंदे यांनी २०१४ च्या शपथपत्रात ही इमारत खरेदी केल्याची माहिती लपविल्याचे स्पष्ट झाल्याचे याचिकेत म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here